Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना - सारंग साठ्ये

Updated: बुधवार, 2 ऑक्टोबर 2019 (11:37 IST)
 
या वेबसिरीजचा शेवटचा भाग 'भारत बंद' या विषयावर आधारित आहे. याबद्दल सारंग सांगतो, "जेव्हा आम्ही या भागाचे चित्रीकरण सुरु केले तेव्हा अनेक अनिश्चित आणि मजेशीर गोष्टी घडत गेल्या तर काही योगायोगही घडले. खरंतर ज्या दिवशी हा भाग चित्रित करायला सुरुवात केली. नेमका त्याच दिवशी खरोखरच 'भारत बंद' होता. त्यामुळे आमचे पहिल्या दिवसाचे शूटिंग रद्द करावे लागले. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा चित्रीकरणाची तयारी केली, मात्र त्यादिवशी आदल्या दिवशी झालेल्या 'भारत बंद'चा निषेध म्हणून बंद पाळण्यात आला. पुन्हा एकदा चित्रीकरण रद्द करावे लागले. 
 
तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही चित्रीकरणाची तयारी केली तेव्हा आम्हाला शूटिंगसाठी आवश्यक असलेली पोलीस व्हॅनच उपलब्ध  नव्हती. आम्ही बुक केलेली व्हॅन दोन दिवस शूटिंग रद्द झाल्याने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या चित्रीकरणासाठी देण्यात आली होती. पुन्हा एकदा आमचे चित्रीकरण रद्द झाले. सलग तीन दिवस शूटिंग रद्द झाल्याने खरंतर आम्ही खूप त्रस्त झालो होतो. अथक प्रयत्नानंतर अखेर चौथ्या दिवशी ठरलेल्या शेड्युलनुसार आमचे चित्रीकरण पार पडले, तेही उत्तमरित्या आणि अपेक्षित अशा सर्व गोष्टी या भागात आम्हाला दाखवता आल्या. हा प्रसंग खरंतर आम्ही कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी हसावे की रडावे, अशी आमची स्थिती झाली होती. मात्र या अनुभवातून खूप गोष्टी शिकता आल्या. ''
 
   'पांडू' या वेबसिरीजमध्ये सुहास शिरसाट आणि दीपक शिर्के यांच्या प्रमुख भूमिका असून या वेबसिरीजला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म  असलेल्या एमएक्स प्लेअर मराठी ओरिजनल्सवर ही  वेबसिरीज विनामूल्य पाहता येईल.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

अद्वितीय शिवमंदिर ''बटेश्वर धाम उत्तर प्रदेश'', जिथे भगवान शिव आणि देवी पार्वती सेठ आणि सेठाणी रूपात विराजमान

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

पुढील लेख
Show comments