1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 एप्रिल 2024 (16:33 IST)

शालू-जब्याचा फोटो व्हायरल, चर्चाना उधाण

Rajeshwari Frendy film
Photo- Instagram
2013 साली नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘फँड्री चित्रपटातील एकत्र दिसलेले राजेश्वरी आणि सोमना यांचा सध्या एकत्र असलेला फोटो सध्या चर्चेत आहे. या फोटोवर चाह्त्ये कॉमेंट्स आणि लाईक्स देत आहे. 
 
नागराज मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘फँड्री चित्रपटात जब्या आणि शालूची भूमिका खूप गाजली होती. राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे यांनी जब्या आणि शालूची भूमिका साकारली होती. या दोघांनीं प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आता पुन्हा शालू आणि जब्याची जोडीची चर्चा होत आहे. फ्रेंडी चित्रपटातील शालू ही सोशल मीडियावर सक्रिय आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

तिने तिचा आणि सोमनाथचा एकत्र असलेला फोटो शेअर केला आहे. त्यात तिने 'कशी काय मग जोडी' असे कॅप्शन देत हार्ट ईमोजी शेअर केले आहे. या फोटोला पाहून चर्चाना उधाण आलं आहे. चाह्त्ये लाईक्स आणि कॉमेंट्स करत आहे. तिच्या फोटोवर 'काळी चिमणी घावली जब्याला अशी कॉमेंट्स एका युजर्सने केली आहे. तर काहींनी जबरदस्त जोडी असे म्हटले आहे. 

Edited by - Priya Dixit