ganesh chaturthi

सराव सामन्यात कांगारू ठरले सरस

Updated: बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (08:47 IST)
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथ व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंसह ट्रेव्हिस हेड व मार्कस स्टॉइनिस यांनी झळकावलेली शानदार अर्धशतके आणि यष्टीरक्षक मॅथ्यू वेडची झंझावाती खेळी यामुळे नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 347 धावांची मजल मारली. त्यानंतर अध्यक्षीय संघाचा डाव 48.2 षटकांत सर्वबाद 244 धावांवर गुंडाळताना ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात शानदार विजयाची नोंद केली.
 
विजयासाठी 348 धावांच्या आव्हानासमोर श्रीवत्स गोस्वामी (43) व मयंक आगरवाल (42) वगळता वरची फळी अपयशी ठरल्याने अध्यक्षीय संघाची 8 बाद 156 अशी घशरगुंडी झाली होती. अक्षय कामेवार (40) आणि कुशांग पटेल (नाबाद 41)यांनी नवव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करीत कडवी झुंज दिली. परंतु कामेवार बाद होताच अध्यक्षयी संघाचा डाव 244 धावांवर संपुष्टात आला. ऍश्‍टन ऍगरने 4, तर केन रिचर्डसनने 2 बळी घेतले.
 
त्याआधी सलामीवीर हिल्टन कार्टराईट शून्यावर परतल्यानंतर बांगला देश दौऱ्यात दोन शतके झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने 48 चेंडूंत 11 चौकारांसह 64 धावा फटकावताना कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाला वेगवान पायाभरणी करून दिली. स्मिथने 68 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 55 धावांची खेळी केली.
 
वॉर्नर व स्मिथ बाद झाल्यावर ग्लेन मॅक्‍सवेल (14) फार काळ टिकला नाही. परंतु 4 बाद 158 अशा घसरगुंडीनंतर ट्रेव्हिस हेड व मार्कस स्टॉइनिस या जोडीने पाचव्या विकेटसाठी 88 धावांची भर घालताना ऑस्ट्रेलियाची आगेकूच कायम राखली. केवळ 63 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 65 धावा करून ट्रेव्हिस हेड बाद झाल्यावर स्टॉइनिसने मॅथ्यू वेडच्या साथीत सहाव्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाल आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
 
स्टॉइनिसने केवळ 60 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 76 धावा फटकावल्या. तर मॅथ्यू वेडने केवळ 24 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 45 धावांची झंझावाती खेळी केली. अध्यक्षीय संघाकडून वॉशिंग्टन सुंदरने 23 धावांत 2, तर कुशांग पटेलने 58 धावांत 2 बळी घेतले. आवेश खान, कुलवंत खेजरोलिया व अक्षय कामेवार यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Asian Games भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिला सामना जपानविरुद्ध खेळेल

डेव्हिस कपच्या दुसऱ्या फेरीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना होणार! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायचा?

भारतीय आणि अफगाण संघ आज तिसऱ्या आणि अंतिम टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गायकवाडची वापसी; नमन धीर आणि आकिब नबीला वनडेमध्ये पहिली संधी

क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी खासदार प्रिया सरोज यांचा विवाह या दिवशी होणार

पुढील लेख
Show comments