शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:14 IST)

बीसीसीआयने खेळाडू आणि संघाची देणी फेडली

बीसीसीआयने  खेळाडू आणि संघाची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयने  वेबसाईटवर टाकली आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ४५ लाख रुपये देण्यात आले आहेत. तर कमीतकमी ९ कसोटी खेळणाऱ्या भारताच्या माजी क्रिकेटपटूंनाही ३५ लाख रुपये देण्यात आले आहेत. या खेळाडूंमध्ये योगराज सिंग, रॉबिन सिंग, सरणदीप सिंग आणि टी.ए.शेखर यांना ही रक्कम देण्यात आली.
 
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून राजीनामा दिलेल्या अनिल कुंबळेलाही त्याच्या थकित मानधनाची रक्कम देण्यात आली आहे.
 
मे आणि जून महिन्याचे मिळून कुंबळेला ४८.७५ लाख रुपये देण्यात आलेत. याचबरोबर बीसीसीआयने स्टुअर्ट बिनीला ५५ लाख रुपये दिले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून टीममध्ये नसलेल्या स्टुअर्ट बिनीला पैसे दिल्यामुळे सोशल नेटवर्किंगवर मात्र बिनी ट्रोल होत आहे. या देण्यांबरोबरच बीसीसीआयने २० कोटी रुपयांचा टीडीएस भरला आहे. बंगळुरूमधील एनसीएच्या नुतनीकरणासाठी बीसीसीआयने कर्नाटक औद्योगिक विकास महामंडळाला ३८ कोटी रुपये दिले आहेत.
 
दरम्यान, २०१७ च्या आयपीएलची उपविजेती टीम रायजिंग पुणे सुपरजायंट्सना २१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर सनरायजर्स हैदराबादला १६ कोटी रुपये मिळाले आहेत. आयपीएलचे मॅच रेफ्री, अंपायर आणि कॅमेरांचे १.६ कोटी रुपयेही बीसीसीआयने दिले आहेत.