बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 20 मार्च 2020 (15:49 IST)

मांजरेकरांना वगळल्याने बीसीसीआयवर टीका

संजय मांजरेकर यांना समालोचकांच्या यादीतून वगळल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मुंबईकर खेळाडूंनी बीसीसीआयवर टीका केली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी आयपीएल स्पर्धेतही मांजरेकर यांना वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संजय मांजरेकर यांनीदेखील हा निर्णय मान्य असल्याचे म्हटले होते. पण आता मांजरेकर यांच्या म दतीला माजी मुंबईकर खेळाडू चंद्रकांत पंडित धावून आले आहेत. 
 
मी मांजरेकर यांना अगदी लहानपणापासून ओळखतो. एखाद्याला इजा करेल असा तो माणूस नाही. तो तची जी काही मते असतील, ती स्पष्टपणे मांडतो आणि मला त्याची हिच गोष्ट आवडते. तुमच्या  तोंडावर खरे बोलणारा माणूस कोणालाच आवडत नाही. समालोचकाच्या भूमिकेत असताना काही वेळा मांजरेकर असेकाही बोलून गेले, जे काहींना आवडले नसावे. पण मांजरेकर केवळ नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कोणाची स्तुती करणारी व्यक्ती नाही, असे सांगत सांगत पंडित यांनी मांजरेकरांची पाठराखण केली.