Dharma Sangrah

संघात समतोल असण्यावर दिला भर

Updated: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (13:52 IST)
 
सध्या भारताचा संघ न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. 24 जानेवारीपासून भारत न्यूझीलंडविरूद्ध टी-20 क्रिकेट मालिका खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने सराव केला. त्यानंतर कोहली याने पत्रकार परिषद घेऊन आपली मते मांडली.
 
राहुलने यष्टिरक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली. राहुलच्या या कामगिरीमुळे आम्हाला नवा पर्याय मिळाला. आता आम्हाला अतिरिक्त फलंदाज खेळवून अधिक समतोल संघ खेळवण्याची संधी मिळू शकते. जर तो यष्टिरक्षक म्हणून अशीच चांगली कामगिरी करत राहिला, तर त्याला यष्टिरक्षणाची जबाबदारी का द्यायची नाही? काही काळ राहुलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी द्याला काहीच हरकत नाही, असे सांगत विराटने अप्रत्क्षपणे ऋषभच्या जागी भारताला उत्तम पर्याय सापडल्याचे संकेत दिले. बाकीच्या खेळाडूंचे काय असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण आमच्यासाठी संघातील समतोल महत्त्वाचा आहे, असेही तो म्हणाला.
 
शिखर धवनच्या दुखापतीमुळे आमच्या काही योजनांना आळा घालावा लागणार आहे. संघात एखादा अतिरिक्त खेळाडू घेऊन राहुलला पाचव्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवावे असा आचा विचार आहे. त्या क्रमांकावर राहुलदेखील खुलून खेळतो. आमच्या संघात तळाला फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. त्यामुळे आम्हाला संघ समतोल करण्याची  संधी आहे, असे विराट म्हणाला.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

India vs Afghanistan श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दिल्लीत दाखल

श्री चरणीने इतिहास रचला; महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ५० बळी घेणारी भारतीय खेळाडू ठरली

भारतीय महिला संघाने बांगलादेशला पराभूत करून आशिया कप २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला

भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेचा पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार

ईस्ट झोनने दलीप ट्रॉफी २०२६ जिंकली; इशान किशनने १३ वर्षाची प्रतीक्षा संपवली

पुढील लेख
Show comments