वर्ल्डकपमध्ये सात वेळा भारत-न्यूझीलंडची टक्कर, जाणून घ्या कोण पडलं भारी
आज भारत आणि न्यूझीलंड संघ विश्व चषकात आठव्यांदा अमोर-समोर असतील. यापूर्वी सात वेळा टक्कर झाली असून त्यात न्यूझीलंडने 4 तर भारताने 3 सामने जिंकलेले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध 252, तर न्यूझीलंडने भारताविरूद्ध 253 धावा अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
मात्र वर्ल्ड कप 2019 स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघाने एकही सामना गमावलेले नाही. दोन्ही अजिंक्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर टीम इंडियाने दोन सामने जिंकले आहेत. दोन विजेत अमोर-समोर असणार म्हणून आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. दुखापतीमुळे शिखर धवन बाहेर असून भारतीय संघाने पर्यायी व्यवस्था केली आहे. तरी न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल सध्या चांगल्या फार्ममध्ये आहे. कर्णधार केन विलियमसन सर्वात अधिक धाव काढणारे फलंदाजापैंकी आहे. तीन क्रमाकांवर उतरुन ते महत्त्वाची भूमिका बजवतात. जिमी नीशम आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलराउंडर आहे. रॉस टेलरचा परफॉर्मंस उंचीवर आहे. ट्रेंट बोल्ट वेगाने विकेट घेणारे खेळाडू आहे. त्यामुळे न्यूझीलंडची गोलंदाजी आक्रमक आणि समोरच्या संघासाठी धोकादायक ठरु शकते.
तसेच इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. तसेच आजच्या खेळावर पावसाची सावट असल्यामुळे षटकांची संख्या कमी होऊ शकते.