शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: कोलंबो , गुरूवार, 12 जानेवारी 2017 (12:01 IST)

जखमी मलिंगा मालिकेला मुकणार!

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा पुढील आठवड्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या वनडे व टी-20 मालिकेत खेळणार नसल्याचे लंकन क्रिकेट मंडळाने सांगितले. गतवर्षीपासून मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. या दुखापतीतून तो अजून सावरला नसल्यामुळे आगामी वनडे व टी-20 मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षी भारतात झालेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान 33 वर्षीय मलिंगाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पुढील  महिन्यात मायदेशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या मालिकेपर्यंत तंदुरुस्त होईल, अशी माहिती लंकन मंडळाने यावेळी दिली.