गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 4 डिसेंबर 2017 (11:41 IST)

विराटने मोडला पुन्हा एकदा स्वतःचाच विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कसोटीत द्विशतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सर्वाधिक द्विशतक ठोकणारा तो एकमेव कर्णधार बनला आहेच. शिवाय कर्णधार या नात्याने सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
 
या अगोदरही हा विक्रम त्याच्याच नावावर होता. 2016 साली विराटने 235 धावा केल्या होत्या. कर्णधार असताना एवढी धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार होता. त्याच्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने 2013 साली 224 धावा केल्या होत्या.
 
कर्णधार असताना सचिन तेंडुलकरनेही 1999 साली 217 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या उभारणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने स्वतःच्याच 235 धावांचा विक्रम मोडीत काढला. दिल्ली कसोटीत विराटने 243 धावा केल्या.