शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (16:13 IST)

15 वर्षांपूर्वी याच दिवशी युवराजचे एका षटकात सहा षटकार

भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग वडील झाल्यापासून आपल्या पत्नीला मुलाच्या संगोपनात मदत करत आहे. बाकी खेळाडूंप्रमाणे त्याने अद्याप प्रशिक्षक बनण्यात किंवा समालोचनात हात आजमावलेला नाही. मात्र, युवीच्या काही खेळी चाहत्यांच्या आठवणीत अजूनही जसच्या तस आहेत. त्यापैकी सर्वात आठवणीतले म्हणजे सहा षटकार, जे त्याने एकाच षटकात मारले आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. त्याच्या खेळीला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत. 2007 मध्ये या दिवशी युवराजने हा पराक्रम केला होता.
 
2007 टी-20 विश्वचषकाच्या एका सामन्यात युवराज आणि इंग्लंडच्या खेळाडूमध्ये वाद झाला होता ज्यानंतर युवी नाराज दिसला. तेव्हा युवी क्रीजवर होता आणि इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड गोलंदाजी करत होता. युवराजने त्याच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकला. युवराजशी वाद घालणारा खेळाडू शांत झाला होता मात्र युवराजने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला. या नंतर इंग्लंडची संपूर्ण टीम गोलंदाजापर्यंत पोहोचली. नंतर युवीने चौथ्या चेंडूवर षटकारही ठोकला. यानंतर सर्वांनी गृहीतच धरले की आज एका षटकात सहा षटकार मारले जाणार आणि नेमके तसेच घडले.
 
युवराजने या सामन्यात केवळ 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि 16 चेंडूत 58 धावा केल्या. युवीचा हा शानदार विक्रम आतापर्यंत एकाही फलंदाजाला मोडता आलेला नाहीत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम युवराजच्या नावावर आहे.