Festival Posters
✕

बाळासाहेब ठाकरे जयंती: पहिले व्यंगचित्र साप्ताहिक 'मार्मिक’

Updated: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (17:09 IST)
 
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. त्यांच्या व्यंगचित्रात इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा आवडती होती. त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.
 
नंतर बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे व्यंगचित्रात्मक साप्ताहिक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऑगस्ट १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना वडील प्रबोधनकारांनी सुचविले होते. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. 
 
संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून टीका केली. १९६० पासून ते राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ठाकरे लहान मुलांसाठीच्या "श्‍याम‘ या पाक्षिकाचे सुद्धा संपादक होते.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

'अर्नब' चक्रीवादळामुळे हाय अलर्ट! ६४ गाड्या रद्द; अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

LIVE: नागपूरमध्ये अचानक भूकंपाचा धक्का बसला

१ नोव्हेंबरपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही

महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या ८३,००० कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार मिळणार; सरकारने ३९१.०२ कोटी रुपयांना मंजुरी दिली

तामिळनाडूतील थेनी तुरुंगातून पळून गेलेल्या १७ कैद्यांपैकी १३ जणांना अटक, निष्काळजीपणाबद्दल ९ तुरुंग कर्मचारी निलंबित

पुढील लेख
Show comments