मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (16:19 IST)

संतूर साबणाची नवी जाहिरात : लग्न

नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे ट्राय करून देखील लव्ह मॅरेज जमवता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांच्या इच्छेनुसार अरेंज्ड मॅरेजला राजी झालेला तो एके दिवशी आईवडिलांसह मुलगी बघायला जातो.
वधूपिता आणि माता तिघांचे स्वागत करतात. सगळेजण दिवाणखान्यात बसतात.
काही क्षणांनी ती कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन येते. अहा! काय तिचे सौंदर्य. देवाने ज्या हातांनी माधुरी, राणी मुखर्जी आणि कतरीनाला बनवले त्याच हातांनी मध्ये ब्रेक न घेता जणू हिला बनवलं आहे.
तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतो. ती एक शालीन स्मितहास्य करते आणि त्याच्यापुढे ट्रे धरते. ट्रेमधली डिश उचलताना तिच्या अंगावरचा मंद उंची परफ्युम दरवळतो आणि त्याला पागल करतो.
ती उजवीकडे सरकते आणि त्याच्या वडिलांसमोर ट्रे धरते. तेव्हा तिच्या शरीराची वीस अंशात वळालेली आकृती तितकीच गोडमिट्ट दिसते. वडील डिश उचलतात.
ती आता त्याच्या आईकडे वळते. आई वडिलांशी काटकोनात बसलेली आहे. त्यामुळे आईपुढे झुकताना तिचा देखणा साईडव्ह्यू दिसतो.
आता ती संपूर्ण पाठमोरी होते. कारण वधूपिता आणि मामा समोर बसले आहेत. 
तो घोगऱ्या आवाजात वडिलांच्या कानात कुजबुजतो. होकार देऊन टाकू. तुम्ही कोणतीही अट घालू नका. आईला पण सांगा.
त्याच क्षणी आतून आवाज येतो, “आले ग मम्मी तू गेलीस का पोहे घेऊन?"
आणि नियोजित वधू लाजत लाजत बाहेर येते...
बाकि काही नाही
संतूर साबणाची नवी जाहिरात