Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज

Updated: गुरूवार, 14 मे 2020 (09:27 IST)
 
त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ला, पुणे येथे झाला. रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यांची आजी जिजाबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. 
 
अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंधर राजकारणी होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजीराजांना राज्याभिषेक झाला. ते राजकारण आणि रणांगण यात तरबेज झाले होते. ते प्रजाहित दक्ष होते. येसूबाई या त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी नऊ वर्षे उत्तम राज्यकारभार केला. 
 
औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठयांनी हिमतीने लढा दिला. 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला.त्यामुळे परिस्थिती कठीण झाली. त्यातच संभाजीराजांच्या पाठीत खंजीर खुपसायला अनेक फितुर सदैव तत्पर होते. 
 
1 फेब्रुवारी 1689 रोजी औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्र्वर येथे संभाजीराजांना पकडले. 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांनी हौतात्म्य पत्करले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

कंगना रणौतचा ५६ लाख रुपयांचा 'लक्झरी लूक' संसदेत चर्चेत, पर्स आणि रोलेक्स घड्याळ चर्चेचा विषय बनले

IND vs AFG T20: भारत सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार

LIVE: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पालघरमध्ये राष्ट्रविरोधी टेलिग्राम ग्रुपचा पर्दाफाश

मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू; नुकसान भरपाई जाहीर

महान लिओनेल मेस्सीने फुटबॉलमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली

पुढील लेख
Show comments