1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (11:53 IST)

फ्लॉरेन्स नाईटिंगेल : ‘लेडी विथ द लँप'

Florence Nightingale
अढळ श्रद्धा, कमालीची सेवाभावी वृत्ती आणि कार्यावरील प्रचंड निष्ठा या बळावर रुग्णांची शुश्रूषा करून या सेवेला जगभर प्रतिष्ठा मिळवून दिलेल्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा आज जन्मदिन. 12 मे 1820  रोजी इटलीतील फ्लॉरेन्स येथे त्यांचा जन्म झाला. महायुद्ध काळात त्यांनी केलेल्या जखमी सैनिकांच्या शुश्रूषेमुळे परिचारिकांना जगभर प्रतिष्ठा लाभली. अंधारात रात्रभर जागून हातात कंदील घेऊन त्या सैनिकांची शुश्रूषा करत असत. त्यामुळे रेडकॉसचे संस्थापक हेन्नी ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लँप' ही उपाधी दिली.
 
सार्वजनिक आरोग्य व रुग्णालयाच्या विषयात विशेष तज्ज्ञ म्हणून गणल्या जाणार्याय फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आधुनिक रुग्णपरिचर्याशास्त्राचा पाया घातला. अत्यंत खडतर परिस्थितीतून आणि विरोधातून रुग्णसेवा करून नाईटिंगेल यांनी आपल्या कामातून   जगापुढे आदर्श निर्माण केला. त्यमुळे महिलांना नर्सिंग क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली. विरोधावर प्रयत्नांनी आणि श्रद्धेने मात करून परिचारिका पदाला प्रतिष्ठा मिळवून देणार्याआ या नाईटिंगेलच्या स्मरणार्थ आजचा दिवस जागतिक परिचारिका दिन मानण्यात येतो. 13 ऑगस्ट 1910 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले.