रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

85 रुग्णांना ठार मारणार्‍या नर्सला जन्मठेपेची शिक्षा

फोटो: सोशल मीडिया

जर्मनीमध्ये युद्धानंतर इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सीरियल किलर एक नर्स आहे. ज्याने आपल्या 85 रुग्णांची हत्या केली आहे. नर्सला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नील्स होएगेल नावाच्या या नर्सची हे कृत्य न्यायाधीश सेबॅस्टियन बेहरमॅनने समजण्यायोग्य नसल्याचे म्हटले आहे.
 
42 वर्षाच्या होएगेलने 2000 ते 2005 दरम्यान हे कृत्य केले आहे. तो मागील एक दशक कोठडीत होता. ज्यात त्याला सहा लोकांची हत्या केल्याच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या प्रकरणात सुमारे 130 मृत शरीराचे पोस्ट मॉर्टम केले गेले. पोलिसांना त्याने 200 हून अधिक हत्या केल्याची शंका आहे.
 
तरी कोर्टात अजून किती हत्या झाल्या आहेत, हे माहीत पडलेले नाही. कारण अनेक पीडितांवर पोस्टमार्टम करण्यापूर्वीच अंत्यसंस्कार केले गेले. बेहरमॅन यांच्याप्रमाणे होएगेलने जेवढ्या लोकांची हत्या केली आहे ते कल्पनेच्या पलीकडे आहे.
 
त्यांनी काही पीडित कुटुंबांना न्याय न मिळाल्यावर खेद जाहीर केले आहे. सुनावणीच्या शेवटल्या दिवशी होएगेलने पीडित कुटुंबांकडून या भयावह गुन्ह्यासाठी माफी मागितली आहे.
 
वर्ष 2005 मध्ये होएगेल रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला घेतल्याविना चुकीचे औषधं देताना धरला गेला होता. नंतर 2008 मध्ये रुग्णांच्या हत्येच्या आरोपात त्याला शिक्षा झाली. पीडित कुटुंबाच्या दबावात 2014-2015 दरम्यान घडलेल्या प्रकरणांचे दुसर्‍यांदा ट्रायल देखील झाले.
 
यानंतर होगएल एक रुग्ण आणि इतर पाच जणांच्या हत्येच्या प्रयत्न करण्याचा दोषी सिद्ध झाला होता. त्याला तेव्हा जास्तीत जास्त 15 वर्षे तुरुंगात टाकण्यात आले ज्याला जर्मनीत जन्मठेपेची शिक्षा मानले जाते.