शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2019 (10:42 IST)

धक्कादायक आरोग्य विभागाच्या वतीने महिला नर्सला दिलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफिती

धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड झाला असून यामध्ये केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नव्या कोऱ्या स्मार्ट फोनमध्ये अश्लील चित्रफिती व छायाचित्र आढळून आली आहेत. या प्रकरणात नाशिक व मालेगाव महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान हा प्रकार गंभीर प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात तीन नाशिक आणि मालेगावच्या दहा महिला नर्सेस (परिचारिका) यांचा समावेश होता. हा सर्व प्रकार समोर आल्याने प्रशिक्षण वर्गात व आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडला आहे. मात्र हा नव्या फोनमध्ये  तांत्रिक बिघाड असे कारण देत सर्व महिलांना दिलेले हँडसेट परत घेण्यात आले आहेत.
 
राज्य शासनाच्या आरोग्य विभगा मार्फत महिला नर्सेसला ईव्हीएन अॅप बाबत एक प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षणात तीन नाशिक आणि दहा महिला नर्सेस (परिचारीका) यांचा समावेश होता. यावेळी या सर्वाना आरोग्य विभागा तर्फे त्यांना नवीन स्मार्ट फोन दिले गेले होते. मात्र जेव्हा हे फोन वाटले आणि सुरु केले गेले तेव्हा त्यामध्ये आगोदरच अनेक अश्लिल चित्रफित आणि फोटो होते. हा गंभीर प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा एकाच गोंधळ निर्माण झाला, पुढे प्रकरण वाढू नेये यासाठी आरोग्य विभागाने तांत्रिक कारण देत हे सर्व फोन काढून घेतले आहेत. महिला दिनाच्या पूर्व संध्येला हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला गेला आहे.

अश्लील चित्रफित प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी
 
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित आणि अश्लील छायाचित्र आढळल्याने याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने डॉ.शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. अश्लील चित्रफित प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी केंद्रसरकार, राज्यसरकार तसेच महापालिकेतील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.