सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सला केले 'किस', व्हिडिओ व्हायरल

उज्जैन जिल्हा चिकित्सालयाचे सिव्हिल सर्जनचे एका सहकर्मी महिलेला 'किस' करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रविवार त्यांना पदावरून हटवण्यात आले.
 
उज्जैन जिल्हा कलेक्टर शशांक मिश्रा यांनी म्हटले की हे प्रकरण अधिकार्‍याला शोभनीय नाही. प्रकरणाचे गांभीर्य बघत जिल्हा चिकित्सालयात पदस्थ सिव्हिल सर्जन डॉ. राजू निदारिया यांना पदावरून हटवले गेले आहे.
 
त्यांनी म्हटले की त्यांऐवजी डॉ. पीएनं वर्मा यांना नियुक्त केले गेले आहे. मिश्रा यांनी सांगितले की निदारिया यांना नोटिस पाठवण्यात आले असून ते दोन दिवसापासून सुट्टीवर आहे. त्यांचे उत्तर आल्यावर चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. 
 
सूत्रांप्रमाणे यात व्हिडिओत दिसत असलेली महिला नर्स पदावर कार्यरत आहे आणि व्हिडिओ जिल्हा चिकित्सालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये तयार केलेला असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल नसल्याचे सांगितले आहे.