अबब.. चितावर झोपलेला माणूस उठून बसला
जाको राखे साइयां मार सके ना कोई... या म्हणीचा अर्थ आहे की देवाच्या इच्छेविरुद्ध कोणाचाही मृत्यू संभव नाही. आणि ही म्हण चरितार्थ झाली आहे जम्मू-काश्मीर येथील रियासी जिल्ह्यात.
येथील पल्लड गावा रहिवासी हरिराम यांच्या मृत्यू झाल्याचे समजून त्यांचे नातेवाईक त्यांना अंत्यसंस्कारासाठी चिनाब नदीच्या किनार्यावर घेऊन गेले. तेथे सर्व तयारी करून त्यांना चितावर ठेवले गेले. चिता जाळण्यापूर्वी कुटुंबातील एक सदस्य जेव्हा त्यांच्या तोंडात तूप टाकायला गेला तेव्हा त्याला शरीर गरम असल्याचे जाणवले. आणि ते श्वास घेत असल्याचे कळल्यासोबतच त्यांना चितावरुन खाली उतरवण्यात आले.
त्यांना लगेच रुग्णालयात हालवण्यात आले. त्यांचे वय 95 असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.