Dharma Sangrah
✕

हे वाचल्यावर अश्रू थांबवणे कठिण होईल

Updated: शुक्रवार, 26 जून 2020 (12:54 IST)
होय जरा शहराबाहेर गेलो होतो...
तेवढ्यात दत्तू म्हणाला आपण आरामात बसा मी काही खायला घेऊन येतो...
साधारण ढाबा पण इथे साहेबांना येणे आवडायचे...कधीही दत्तूला काही विशेष ऑर्डर देण्याची गरज भासायची नाही....तो आपल्या मनाने पदार्थ प्लेटमध्ये घेऊन येत असे आणि साहेबांना पसंत पडला नाही असे कधीच झाले नाही..
माहीत नाही दत्तूला साहेबांची आवड कशी कळत होती. वरून पैसेही कमी मोजावे लागायचे..
साहेब विचार करत बसलेच होते तेवढ्यात गरमागरम कांदा भज्यांचा सुवास आल्यावर ते खूश झाले.
 
"अरे दत्तू, तू जादूगर आहे रे ! या वातावरणात याहून चांगला माझा आवडीचा पदार्थ नाही, साहेबांनी भजींचा स्वाद घेत संतुष्टपणे म्हटलं.
साहेब पोटभर खा मी आल्याचा चहा आणतो...
साहेबांचा मूड ऐकाऐक फ्रेश होऊन गेला.
बघ आज मी तुझं काहीही ऐकणार नाही, खूप छान जेवण बनतं तुझ्याकडे, साहेबांनी पुन्हा आपला नेहमीचा हठ्ठ धरला की आज तर मी तुझ्या स्वयंपाकघरात शिरणार आणि कुकला भेटणार. मला इतके चांगले पदार्थ खायला देणार्‍याचे आभार नको मानायला....
दत्तू थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला पण साहेब सरळ स्वयंपाकघरात शिरले...
आत डोकावून बघितलं तर एक म्हातारी बाई चहा बनवत होती, ती खूप खूश दिसत होती.
 
"आई" साहेबांच्या तोंडून निघालेला शब्द...जीभ जड झाली होती पण हिंमत करून विचारलं... मी तर तुला वृद्धाश्रमात ठेवलं होतं नं..... 
होय बेटा पण जे सुख मला तुला येथे राहून तुला जेवू घालण्यात आहे ते सुख तेथे नाही बाळा...
आज साहेबांना कळून चुकलं होतं की येथे जेवणं करायला त्यांना का आवडायचं आणि पैसे देखील कमी पडायचे.

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Gandhi Jayanti Wishes In Marathi 2026 गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Mahatma Gandhi Jayanti 2026 महात्मा गांधी यांच्यावर निबंध

कॅप्टन स्मित मच्छर यांना 'विशिष्ट गुजरात सन्मान पुरस्कार' प्रदान! पटेल सरकारची मोठी घोषणा

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान भारतीय संघात बदल, वॉशिंग्टन सुंदर टी-२० मालिकेतून बाहेर

रायगडच्या दिवेआगर बीचवर भीषण दुर्घटना; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments