Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई हेच आपले खरे दैवत

Updated: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (17:56 IST)
आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेणारी, कोणाला काय हवं काय नको, सर्वांचे मन जपणारी, त्यांच्याकडे लक्ष देणारी आई सर्वांसाठी झटते, राब राब राबत असते. 
 
सर्वांसाठी चांगले अन्न शिजवते. मुलांना संस्काराची शिदोरी देते. कुटुंबीयांचा मागे खंबीरपणे उभारून आलेल्या परिस्थितीला तोंड देणारी सुद्धा आपली आईच असते. 
 
आई ही बाळाची पहिली गुरु मानली जाते. बाळाला योग्य मार्ग दाखवते आणि वेळो-वेळी आपले मार्गदर्शन करते. मुलांच्या चुकीला सुधारते. शिस्तबद्धता, विश्वास ठेवणं, सगळ्यांचा आदर करणं मग तो मोठा असो किंवा लहान, शिकवते आणि समाजात एक चांगले व्यक्तिमत्त्व घेऊन जगणे शिकवते. वेळ पडल्यास मुलांना चांगले घडविण्यासाठी तिला आपले कर्तव्य पार पडताना कठोर बनावे लागतं.
 
आई ही एका वृक्षाप्रमाणे असते जी आपल्याला मायेची सावली देते. आपल्याला काही दुखापत झाली किंवा आपण अडचणीत असलो की आपल्या ओठांवर सर्वात पहिले नाव येते ते आईच असते. आपल्या कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यावर आईच दिवसरात्र एक करून त्यांची काळजी घेते. आपल्या मुलांना घडविण्यात आईचा मोलाचा वाटा असतो. याचे प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला आई जिजाऊने शिवाजी महाराजांना दिलेल्या शिकवणी ने दिसून येते. शिवबा यांना स्वराज्याची शिकवण आई जिजाऊ यांनीच दिली होती. महात्मा गांधी यांच्या मनात देखील सत्याग्रहाचा धडा त्यांच्या आईनेच शिकवला. आचार्य विनोबांना भूदानाची कल्पना त्यांच्या आईच्या शिकवणीतूनच मिळाली.
 
आई अशी व्यक्ती आहे जी अगदी निस्वार्थपणे आपल्या मुलाचे संगोपन करते. त्यांना चांगले घडविण्यासाठी धडपड करत असते आणि ती पण कोणत्याही परतफेडाची अपेक्षा न बाळगता. आई हा मायेचा सागर आहे त्यामधून आपल्या मुलांसाठी माया ओसंडून वाहत असते. या जगात आईची तुलना कोणाशी ही करता येणं अशक्यच आहे आणि तिची तुलना कोणाशी करूही नये. 
 
असे म्हणतात की मुलांचे यश आणि अपयश त्यांच्या मिळालेल्या संस्कारावर अवलंबवून असत. पण 
 
आजच्या जगात अशी मुलं देखील आहेत जी लहान पणी तर चांगली संस्कारी असतात. पण मोठी झाल्यावर आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना ओझं समजतात आणि काही स्वार्थी लोक असे ही असतात जे आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईची पाठवणी थेट वृद्धाश्रमात करतात. असे करणं सरासर चुकी चे आहे. असे अजिबात करू नये. आपण आपल्या वृद्ध आईची सेवा करावी. कारण तिने जे आपल्यासाठी केलेले आहे त्याचे ऋण आपल्यासाठी फेडणे या जन्मात तरी अशक्य आहेत. पण काही मुलं पैशाच्या रूपाने ते ऋण परत फेडू बघतात. पण मुलांना हे माहिती नसत की म्हातारपणी आईला कसलीही अपेक्षा नसते. ती  फक्त आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेण्यासाठी आसुसलेली असते. 
 
आपल्याला आपल्या आईचा सांभाळ करायला हवा. कारण कोणत्याही धनसंपत्तीची तिला अपेक्षा नसते. ती भुकेली असते ती फक्त प्रेमाची. आपल्याला आपल्या आईला आदर द्यायलाच पाहिजे. कारण आई नाही तर आपले अस्तित्वच नाही. आई नाही तर काहीच नाही. कारण आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. वात्सल्य मूर्ती असणाऱ्या जगातील सर्व मातांना कोटी-कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

गणेशोत्सवासाठी वर्ध्यातून कोकणला ४० एसटी बस जाणार

LIVE: मंत्री नितेश राणे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली

पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने ठाण्यातील एका विद्यार्थ्याची २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

iQOO Z11x 5G : 7200mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 120Hz डिस्प्ले असलेला शक्तिशाली 5G फोन लॉन्च

मराठा आरक्षण आंदोलनाच्या ११ व्या दिवशी मनोज जरांगे-पाटील यांचा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर जोरदार हल्ला

पुढील लेख
Show comments