Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडगावची लढाई

Updated: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (17:49 IST)
 
नोव्हेंबर 1778 मध्ये कॅप्टन जेम्स स्टीवर्ट आणि कर्नल एगर्टन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सैन्याने मुंबईहून बोर घाटमार्गे पुण्याच्या दिशेने वाढणं सुरु केले. कर्नल एगर्टनने बेलापूर किल्ला ताब्यात घेतला आणि पनवेल येथे तळ स्थापन केला 22 नोव्हेंबर 1778 रोजी कॅप्टन स्टीवर्ट खंडाळ्याकडे निघाले.
 
इंग्रजांकडे 4,000 तोफखाना आणि बंदुकधारी सैन्य होते आणि त्यांच्यासोबत रघुनाथराव आणि त्यांच्या सैनिक आणि घोडदळाच्या छोट्या तुकड्या होत्या.
 
पनवेलहून कर्नल एगर्टन खोपोली पोहोचले आणि तिथे दुसरा ब्रिटिश तळ स्थापन केला. तोपर्यंत कॅप्टन जेम्स स्टीवर्ट खंडाळा गावात पोहोचले आणि त्यांनी घाटाच्या शीर्ष स्थानावर तळ स्थापित केला. कर्नल एगर्टन तिथे लवकरच पोहोचले आणि त्यांनी आपल्ंे सैन्याला दोन भागात, लेफ्टनंट कर्नल के आणि लेफ्टनंट कर्नल कॉकबर्न ह्यांच्यात विभाजित केले.
 
मुंबईहून सुरुवात करण्यापासून ह्यापर्यंत त्यांना मराठांनी काही नुकसान पोहोचवले नव्हते आणि त्याकारणे त्यांचा मनोबल खूप जड होता.
 
येथे जवळ -जवळ 10 हजार मराठांची फोज तयार होती ज्याचा नेतृत्व तुकोजीराव होळकर आणि सेनापती महादजी शिंदे हे करत होते. महादजीने इंग्रेजांच्या कूच मंद केला आणि पुरवठा पंक्ति  तोडण्यासाठी पश्चिमेकडे सैन्य पाठवले. त्यांना याची माहिती मिळताच इंग्रज तळेगाव येथे थांबले. नंतर मराठा घोडदळांनी शत्रूला सर्व बाजूंनी घेराबंद केला. त्यांनी इतर प्रकाराची रणनीतीचा उपयोग केला जसे गावे रिकामी करणे, अन्न-धान्य काढून टाकणे, शेतजमीन जाळणे आणि पाण्याचे बरा विषारी करणे.
 
इंग्रजांनी मध्यरात्री तळेगावातून माघे होण्यास सुरुवात केली, पण मराठ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून 12 जानेवारी 1779 रोजी ब्रिटीश सैन्याला घेरले होते, ज्याच्या फळस्वरूपात त्यांना वडगावात थांबावं लागलं. पुढच्या दिवस संपण्याधी इंग्रेज आत्मसमर्पणावर चर्चा करण्यास तयार होते.
 
16 जानेवारी, इंग्रेज आणि मराठांमध्ये 'वडगावची संधी' झाली, ज्याच्यानुसार 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे ऑफिसने ताब्यात घेतलेला सर्व मुलूख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्चही द्यायचा होता.
 
बंगालमधून पुण्याकडे कूच करणाऱ्या ब्रिटीश सैन्याला थांबवणे आणि भरुच जिल्ह्याच्या महसुलाचा वाटा करणे ह्याचे देखील करार यात होते.
 
इतिहासकार डॉ कर्नल (निवृत्त) अनिल आठले यांच्या मतानुसार, वडगाव मावळची विजयच्या मराठा अभिमानात विशेष स्थान आहे. ते म्हणतात, "भारतात इंग्रजांना चार वेळा जोरदार प्रतिकार झाला आणि वडगाव मावळची घटना ही एकमेव वेळ होती जेव्हा त्यांना आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करावी लागली आणि परतावं लागला."
 
2003 मध्ये 'एक्स्प्रेस नागरीक वडगाव विजयस्तंभ प्रतिष्ठान' नावाच्या विजयस्तंभ वडगावच्या लढाईच्या स्मरणार्थ बनवण्यात आला. हा विजय आजही येथे दरवर्षी साजर करण्यात येतो.
 
- हर्षिता बारगल

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ नवीन विशेष गाड्या जाहीर

LIVE: मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ नवीन विशेष गाड्या जाहीर

इन्फ्लुएन्सर मनजीत कौरला झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आले; ५४ दिवसांनंतर तिचा मृत्यू

पुण्यात घराच्या दाराआड किरकोळ वादावरून लेकानं आईचा गळा चिरून निर्घृण हत्या केली

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत संजय राऊतांच्या २५ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments