शनिवार, 21 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

गुलाम व्यापार आणि त्याच्या निर्मूलनाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय दिवस

"मानवी शोषण एकदाच आणि कायमचे नाहीसे करण्याची आणि प्रत्येक व्यक्तीची समान आणि बिनशर्त प्रतिष्ठा ओळखण्याची हीच वेळ आहे. आज आपण भूतकाळातील पीडित आणि स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करूया जेणेकरून ते भावी पिढ्यांना न्यायी समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील."   -UNESCO
 
23 ऑगस्ट हा गुलाम व्यापार आणि त्याच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून युनेस्कोने घोषित केला. या दिवशी, 1791 मध्ये सॅंटो डोमिंगोमध्ये एक बंडखोरी सुरू झाली ज्याने ट्रान्स-अटलांटिक गुलाम व्यापार नष्ट करण्याचा मार्ग मोकळा केला. 
 
या स्मरणार्थ, गुलामांच्या व्यापाराच्या इतिहासाविषयी जागरुकता पसरवण्याची गरज अधोरेखित करण्याचा युनेस्कोचा उद्देश आहे जेणेकरून लोक आधुनिक जगावर गुलामगिरीचा प्रभाव ओळखू शकतील.
 
प्राचीन भारतीय समाजात 'गुलाम प्रथा' ही नेमकी नसावी हे आपण ह्यावरुन म्हणू शकतो की ऋग्वेदात दास आणि दासी हे शब्द अनेक वेळा वापरले आहेत आणि ते ही  वेळ्ग्या संदर्भात जसे की राक्षसी वर्णाचा शत्रू, पगारी नोकर अशा अनेक अर्थांनी वापरले गेले. धर्मशास्त्राने गुलामाशी मानवीय व्यवहार केले पाहिजे असा लोकांना कळवलं आहे. हे जाणून घेणे आणखीन मनोरंजक आहे की कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात गुलाम बनवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना कठोर शिक्षा आहे.
 
हिंदू सभ्यतेमध्ये 'दास' त्या व्यक्तीला म्हटलं गेले आहे जो एकतर सेवा - चाकरी करतो किंवा आपल्याशी मोठे कोणी विद्वान संत किंवा व्यक्तिमत्वला आपला आदर्श किंवा गुरु मानतो. ग्रीस, रोम आणि इजिप्त सारख्या समाजांसारथी भारताची स्थिती नव्हती जेथे गुलामांना क्रूरपणे वागवले जात असायचे.
 
मेगॅस्थेनिस सांगतात की भारतात गुलाम नव्हते, पण अर्थशास्त्र समकालीन भारतात गुलामगिरीचे अस्तित्व नोंदवते; ओनेसिट्रसच्या अहवालाच्या आधारे स्ट्रॅबोने मेगास्थेनिसच्या दाव्याचाही प्रतिकार केला. इतिहासकार शिरीन मौसावी मानतात की गुलाम बहिष्कृत होते आणि त्यांना समाजाचे सदस्य मानले जात नव्हते. इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते, भारतीय समाजातील गुलाम आणि इतर यांच्यात तीव्र फरक नसल्यामुळे (ग्रीक समाजाच्या विरूद्ध) मेगॅस्थेनिसला गोंधळात टाकले असावे: भारतीयांनी उत्पादनाचे साधन म्हणून गुलामगिरीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला नाही आणि भारतातील गुलाम परत विकत घेऊ शकतात किंवा त्यांचे स्वातंत्र्य त्यांच्या स्वामींद्वारे जारी करता येतं. 
 
मध्ययुगीन भारतात दासत्व 'गुलाम गिरी' मध्ये परिवर्तित होताना दिसले, कारण होते इस्लामिक आक्रमणे. भारतात इस्लामिक शासन स्थापित होण्यासह गुलाम प्रथा वाढली. युद्धनंतर लोकांना हाथ पाय बांधून ताब्यात घेतले जात असे, त्यांना गुलाम बनवून त्यांच्याशी इतर काम करवली जात होती आणि कोणत्याही आदेशाला नाकारण्यावर त्यांना प्रताडित केले जात असे. तेव्हा गुलामांची विक्री ही एक सामान्य प्रथा होती. गुलामगिरीशी स्वतःला वाचवण्यासाठी असंख्य हिंदू स्त्रियांनी जौहर किंवा सामूहिक आत्महत्या केल्याचे इतिहासात नोंद आहे.
 
आधुनिक भारतीय इतिहासात गुलामांचा व्यापार मद्रासमध्ये आणि संपूर्ण दक्षिण भारतात पसरलेला होता. नेपाळी तरुण मुलींना भारतात लैंगिक गुलामगिरीत विकले जात असे. एका दृष्ट्या बघितलं तर इंग्रेजांनी तर पूर्ण भारताला गुलाम बनवलं होतं.
 
गुलाम प्रथा ही भारतीय संस्कृतीची देणगी नव्हती. 'दास ' ही व्यक्ती स्वतःच्या संमतीने असयाचे आणि दासत्व मध्ये देखील नियम धर्म असायचे. जगातले इतर आक्रमणकारी ज्यांनी भारतावर राज केलं त्यांनी आपल्या आपल्या पातळीवर गुलाम प्रथेला प्रोत्साहान दिला. ह्याच्या परिणामस्वरुप आज देखील आपल्या समाजात बंधनकारक मजुरी ह्यांची संख्या आहे. बंधपत्रित मजुरी ही कल्पनाच सनातन धर्माच्या भावनेच्या विरुद्ध आहे ज्यांनी हजारो वर्षांपासून हिंदू संस्कृतीवर शासन केले ह्याला मूळापासून कापून फेकले पाहिजे.
 
- हर्षिता बारगल