ganesh chaturthi

लहरींचा खेळ

Updated: सोमवार, 4 मार्च 2024 (16:43 IST)
तुम्ही क्रिया सकारात्मक करा तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल..
 
नकारात्मक केलीत तर नकारात्मकच मिळणार..
 
क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच..
 
कारण लहरीचं जाळं हे सगळी कडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं. 
   
आपल्या संतांनी यावर बऱ्या पैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं, आचार विचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे.
 
गुरू बऱ्याचदा दूर अंतरा वरून ही आपल्या शिष्याला दीक्षा देतात, किंवा एखादा संदेश पाठवतात आणि *शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते, हे बऱ्याचदा घडले आहे.
 
मोबाईल तर आता आले पण विचार लहरीं  द्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळी ही अवगत करता येत होती..
 
साईचारित्रात याचा उल्लेख आहे की, श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्ती कडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते.. ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले, त्या क्षणी साईं ना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की, ही व्यक्ती आपल्या गुरुबंधू ने दिलेले श्रीफळ आणत आहे..
 
तसेच शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईनाथांना, माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विंनती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले, माझा भाऊ गेला.
 
आज ही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते.. 
 
संकटकाळात गुरुचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते.. ही त्या सद्गुरूं नी पाठवलेल्या आशीर्वाद रुपी लहरीं मुळेच ..
    
या आणि अशा अनेक घटना बघितल्या, वाचल्या की,'विचार लहरीं'चे संक्रमण होत असते हे नक्की..
 
म्हणजे "विचार लहरी " या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात ..
 
ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत..
 
घरात एकमेकांशी बोलताना, अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारत्मक हवं, हे लक्षात घ्या..
 
तरचं तुम्ही ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल..
 
जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा आणि जसा विचार कराल, तेच सगळं आकर्षित होईल.. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल..
 
त्यामुळे ते सकारात्मक, चांगले हवे की, नकारात्मक, दुःखी हवे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता.
 
मला तर वाटतं वास्तुशात्रा नुसार घरात फेर बदल करण्या बरोबरच आपल्या घरात प्रार्थना, उपासना, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणं, कलह टाळणं येवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा  निर्माण होते ते..
 
अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता.
 
तेंव्हा असं सकारात्मक वागून, सकारात्मक विचार करून एकदा त्या सकारात्मक ऊर्जेचा अनुभव घ्याच....
 
-सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments