Mahatma Jyotiba Jayanti 2023 :महात्मा ज्योतिबा फुले यांचे महान विचार
* देव आणि भक्त या मध्ये मध्यस्थाची गरज नाही.
* कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.
* दुसऱ्या व्यक्तीचे हक्क हिरावून घेऊ नये.
* मानवासाठी अनेक धर्म अस्तित्वात आले पण धर्म सगळ्या मानवासाठी का निर्माण झाला नाही.
* मासा पाण्यात खेळतो त्याला गुरुची आवश्यकता नसते.
* सत्य पालन हाच धर्म बाकीचे सर्व अधर्म आहेत.
* स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय.
* स्व कष्टाने पोट भरा .
* स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड रचले.
* सत्कर्म करण्याचे वैभव मिळणार नाही परंतु शांती सुख मिळेल, तर दुष्कर्म करण्याने वैभव मिळेल पण शांती, सुख मिळणार नाही, हे निश्चित.
Edited By- Priya Dixit