सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (19:36 IST)

जागतीक शांती दिवसा निमित्ताने

शांती, कित्ती असते महत्वाची,
ज्याच्या त्याच्या जवळ गरज असते असण्याची!
तिची अनुपस्थिती म्हणजे नुसता सावळागोंधळ,
जिकडे तिकडे नुसती चाललेली पळापळ,
ती असली की सुरळीत चालतो कारभार,
डोक्यावर नसतो च मुळी चिंते चा भार!
घर असो की घराबाहेर, सोबत चालावी ती सावली प्रमाण,
चेहेऱ्यावरही ती विसावते, समाधान रूपांन!
एकदा तिची साथ करून तर बघा, चालेल सगळं सुचारु,
जागतीक शांती ही नांदेल, हाही कुठंतरी विचार करू,
करू या का मग प्रयत्न "शांती"ची कास धरण्याचा,
थोडक्यात काय एक पाऊल पुढं,या सकारात्मक विचारांचा!
...अश्विनी थत्ते