Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

International Tiger Day 2023 आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

Updated: शनिवार, 29 जुलै 2023 (12:04 IST)
 
भारतात वाघांची स्तिथी :-
जगात असलेल्या वाघांमधून 70 % वाघ भारतात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आकड्यांप्रमाणे भारतात वाघांची संख्या 2018 मध्ये 2,967 वरून 2022 मध्ये 3,167 पर्यंत वाढली आहे.
 
भारतने वाघ आणि इतर वन्यजीवांचे संरक्षणासाठी अनेकदा पाऊल घेतले आहे. 1972 मध्ये वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आलं. 1973 मध्ये भारत सरकारने "प्रोजेक्ट टायगर" ह्याची स्थापना केली होती. मुख्यत: ह्याचा उद्देश्य बंगाल टागरर्सचे मूळ वातावरणात संरक्षण करायचं होतं त्याचबरोबर देशात असलेले इतर वाघांची प्रजातींना लुप्त होण्यापासून वाचवण्याचे कार्य देखील होते. 80 च्या दशकात जिथे 9 वाघ आरक्षण केंद्र होते तिथे 2022 मध्ये उत्तर प्रदेशचे राणीपुर वन्यजीव अभयारण्य येथे देशाचा 54 व्या वाघ राखीव केंद्राची स्थापना झाली.
 
वर्ष 2022 मध्ये टायगर प्रोजेक्टची 50 वी वर्षंगाठ साजरी करताना आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) ह्याची स्थापना केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात मोठ्या मांजरींच्या प्रजाती वाघ, सिंह, लेपर्ड, स्नो लेपर्ड, चित्ता, जग्वार आणि प्यूमा ह्यांना संरक्षित ठेवायला आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) सुरू केले. ह्याचे उद्देश्य 97 देशात असलेले नैसर्गिक अधिवासापर्यंत पोहोचण्याचे आहे.
 
वाघांचे लुप्त होण्यामध्ये सगळ्यात मोठे कारण म्हणजे शिकार, वन्यजीवांचा अवैध व्यापार, वनस्पती नुकसान, हवामानमधील बदलाव हे आहेत. वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा समोर आणले कारण ह्यांचे आपले इकोसिस्टममध्ये मह्त्वाचे योगदान आहे.  न केवळ ह्यांचे योगदान पण सगळे जीव-जंतूंनाही जिवंत राहायचं अधिकार आहे. 
 
ह्यांच्या संरक्षणासाठी आदिवासी जनजातींचं मोठा योगदान मानलं गेलं आहे. ते न केवळ जनावर आणि वनस्पतींच्या संरक्षणासाठी निस्वार्थ कार्य करतात पण विकसित शहरांप्रमाणे प्रागतीच्या नावावर वन्यजीव आणि नैसर्गिक स्थानानं कष्ट देखील पोहोचवत नाहीत.
 
भारतमधील काही प्रमुख व्याघ्र प्रकल्प :-
* कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, उत्तराखंड
* बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
* काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम
* पेंच राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
* रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान
* कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
* सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल
* पन्ना राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश
* बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक
* सातपुडा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

LIVE: वैशाली दरेकर यांचा उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा

सिद्धिविनायक मंदिरात १८ कोटी रुपयांची मोठी चोरी उघडकीस, ४६ कर्मचारी निलंबित , ९ जणांना अटक

कुर्ल्यातून अपहरण झालेला ६ महिन्यांचा मुलगा ४ तासांत सापडला, आरोपीला अटक

विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेस मध्ये येण्याचे ऑफर दिले

पुढील लेख
Show comments