Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर काय भारत 'लिंचिस्तान' बनत आहे ...?

Updated: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (18:24 IST)
 
मॉब लिंचिंगची सर्वात मोठी घटना 1 जुलै 2018 रोजी घडली. महाराष्ट्राच्या धुळे जिल्हाच्या रानपाडा गावात लोकांनी 5 जणांना ठार मारून कायदा आपल्या हाती घेऊन न्याय केले. या 5 जणांवर 'मुलं चोर' असण्याचा आरोप होता.
 
आसामच्या कर्बी अगलांग जिल्हाच्या दुर्गम ठिकाणी 9 जून 2018 रोजी सोशल मीडियाने पसरविल्या 'मुलं चोर टोळी' च्या बातमीने 2 संशयितांना गावकऱ्याने ठार मारले.  
 
वेल्लोर जिल्ह्यात 28 एप्रिल 2018 रोजी एका हिंदी भाषी मजुरास 'मुलं चोर' असण्याच्या संशयावरून ठार मारले. तसेच जूनमध्येच चेन्नईच्या तेनमपेट भागात स्थानिकांनी 2 प्रवासी मजुरांना 'मुलं चोर' असल्याच्या संशयावरून मार-हाण केली.
 
15 जून 2018 रोजी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात मुरकी गावात एका सॉफ्टवेअर इंजिनियरांची निव्वळ व्हाट्सअॅप वर 'मुलं चोर' असल्याच्या पसरलेल्या अफवांमुळे संशयावरून हत्या केली. ह्यात 3 जण गांर्भीयरित्या जखमी झाले.
 
21 जुलै रोजी पाकिस्तानच्या सीमे जवळच्या राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील खेताराम भिल्ल याची एका मुस्लिम महिलेशी 'अनैतिक संबंधाच्या' आरोपांवरून 12 जणांनी ठार मारल्याची बातमी आहे. 
 
16 जून 2017 रोजी राजस्थानच्या प्रतापगडामध्ये मुस्लिम नगरसेवक जफर हुसेन याला सरकारी नगर परिषद कर्मचार्‍यांनी मारहाण करत ठार केले. जफरने आपल्या अधिकाऱ्यांना उघड्यावर शौच करीत असलेल्या महिलांची छायाचित्रे घेण्यास रोखले होते.
 
22 जून 2017 रोजी काश्मीर येथे सुरक्षा अधिकारी मोहम्मद अयुब पंडित याला गावकऱ्यांनी निर्वस्त्र करून ठार मारले. कारण ते मशिदी बाहेर उभारून लोकांचे फोटो घेत होते.
 
24 जुलै 2018 रोजी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात संतप्त जमावाने 4 बायकांशी गैरवर्तन करून(निर्वस्त्र करून) त्यांना मार-हाण केली आणि त्यांच्यावर 'मुलं चोर' असल्याचा आरोप होता. त्याच महिन्यात अश्या 2 अजून घटना झाल्या आहे.
 
2017 जुलै मध्ये हरियाणाच्या बल्लभगढ येथे वयोगट 16 वर्षाच्या जुनेदला निव्वळ ट्रेन मधील सीटवर बसण्याच्या वादातून ठार मारले. 
 
एकंदरीत गेल्या काही दिवसांपासूनच संपूर्ण भारतात अश्या बऱ्याच घटना घडल्या आहे. ज्यात सोशल मीडिया आणि त्यावर पसरविलेल्या अफवांना आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या शासनास सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकार लावली आहे. आणि त्याला "भीडतंत्राचा अराजकपणा" असे म्हटले आहे. 
 
पण एक प्रश्न उद्भवतो की या संतप्त जमावाचा मूळ खलनायक आहे तरी कोण ? 
यंदाचा काळ हा डिजीटल युगाचा आहे. इथे कुठलीपण माहिती विजेच्या वेगाने प्रसरण पावते. शहर असो किंवा गाव असो आधीच्या काळी गावा गावात एकत्र होऊन होणारी चर्चा आता सर्वत्र पसरत आहे. आता ह्याचे दुरुपयोग होऊ लागले आहे. लोकं  अनिष्ट माहिती बघण्या आणि वाचण्यासाठी याचा गैर वापर करत आहे. समाजात प्रेमाचे स्वरूप आता पॉर्न मध्ये बदलत आहे. अधीरपणा, थेट संवाद न होणे त्यामुळे सामाजिक गुन्हेगारी वाढत चालली आहे. अविचारी संदेश सर्रास पुढे पाठवले जातात. मुलांची चोरी, धार्मिक, राजकीय किंवा सुनियोजित अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे जमावा कडून संतप्त प्रतिक्रिया येते आणि वैचारिक मतभेद होतात आणि तशी प्रतिक्रिया दिली जाते.  
 
या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाच्या हाती असणारा स्मार्टफोन. त्यावरून सोशल मिडिया वर पसरणारे असंतोषजनक कथन. मुलांची चोरी सारख्या बऱ्याच अफवा व्हाट्सअॅपवर पसरवल्या जातात. ताण तणाव निर्माण होऊन काही गोंधळ होऊ नये त्यासाठी प्रशासन सर्वात आधी इंटरनेट वर बंदी घालण्याचे हे मुख्य कारण आहे. असे बघण्यात आले आहे की व्हाट्सअॅप वरून अश्या अराजकता पसरविणाऱ्या संदेशामुळेच जमाव संतप्त होतो आणि गैर वर्तन करतो. सोशल मेसेजिंग अॅप्स व्हॅट्सअॅपवरून सर्रास या संदेशांची सत्यता प्रमाणित न करता पुढे पाठवतात. काही वेळा पूर्वी वैमनस्यावरून पण जमाव उग्र रूप घेतो. आणि गर्दीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी घेत असे. 
 
कधीतरी कुठे तरी एक शब्द वाचला होता 'लिंचिस्तान'. ते आजच्या वातावरणास साजेशीर आहे असे वाटते. काही वेळा या घटनेची दुःखदायक बाब म्हणजे काही राजकीय आणि सामाजिक संस्था आपापल्या सुविधेनुसार घटनेला अधिक वळण देतात. अश्या स्थितीत त्यांचा विरोध करण्याचे घटनाक्रम राजकीय वाटू लागते. त्यामुळे ते निवळते. 
 
संपूर्ण जगाला शांती देणाऱ्या या देशात आजचा काळी एक भयावह मॉब संस्कृतीने तोंड वर केले आहे. त्यामुळे शांती आणि अमनची वाट दाखवणारा हिंदुस्तान आता लिंचिस्तान बनत चालला आहे की काय असा मोठा यक्ष प्रश्न पुढे आला आहे?
About Author
संदीपसिंह सिसोदिया
Sandeep Sisodiya.... Read More

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वे १ सप्टेंबरपासून मुंबई उपनगरीय ट्रेन्ससाठी सुधारित वेळापत्रक लागू करत आहे

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली, मुंबईत आयसीयूमध्ये दाखल

पश्चिम रेल्वेचे नवीन वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू होणार, ६ नवीन लोकल ट्रेन्स आणि एसी लोकल ट्रेन्सची संख्याही वाढणार

टीम इंडिया सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार

महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments