Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंपळपान

Updated: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (12:43 IST)
 
पिंपळ हा कल्पवृक्ष असून तो प्रत्येकाला काही ना काही तरी देतच असतो! एखाद्या घरातल कर्त्या पुरुषासमान!... आणि तो भासतोही तसाच. याचा आणि शाळेचा काय त्या देवानं रेशमी धागा जोडला कुणास ठाऊक पण.. हा अगदी    भूमिपूजनापासून त्या शाळेच्या आवारात न सांगता येतो! याला कोणी निरोप देत नाही की याची कोणाला आठवण होत नाही. पण ... हा तेथे हजर होतो! कधी मला याला 'निलट'च म्हणावसं वाटतं!... किंवा गेल्या जन्मीचा एखादा पिसाटलेला शिक्षक.....!
 
दगडांवर घाव घालून, शाळेची इमारत बांधली जाते ती यच्याच छायेत बसून! दमलेल्या कामगारांना हाच थंड वारा घालतो! संस्थापकानेसुद्धा पहिला वर्ग जमविलेला मी कित्येक वेळा याच कल्पवृक्षाच्या छायेत पाहिलाय! हे पिंपळपान पण कोणत्याही कामगाराच्या किंवा संस्थापकाच्या लक्षात राहात नाही..! हेमंत-शिशिराचा थंडावा सोसून, अंगाला पुन्हा पांतस्थासाठी वसंतास स्वतःला सोपवून मोकळा होतो तो पिंपळच! वटवृक्षासारखा हा ब्रह्म जरी नसला तरी शांत-निर्मळ पालनकर्त्या विष्णूसारखा नक्कीच आहे. 
 
याचा रंग सुवर्णाला सुद्धा चोरता यावा एवढा हा शांत! याच हसण्याने मोर घाबरतो म्हणे... आश्चर्य आहे..! पण याच्याच वाळलेल्या पिंपळपानावर पाय पडताच त्याला ताल धरता येतो हे तितकेच सत्य आहे! हे पिंपळपान त्या मोराच्या   लक्षात कसे काय राहात नाही...!
 
आच कॉलेजच्या आवारात एक भला मोठा पिंपळवृक्ष होता. तो अतिशय विशाल असल्याने तो वृद्ध भासत होता. माला कोणी जन्म दिला किंवा याचा कोणत्या सरांनी सांभाळ केला हे महत्त्वाचे नसून तो आम्हाला काय काय द्यायचा हेच महत्त्वपूर्ण आहे! पिण्याच्या पाण्याची टाकी याच्याच थंड छायेत तृषितांना तृप्त करत होती. ती पण गर्वाने फुगलेली.. हा मात्र तसाच निश्चिंत. हा मात्र कधी त्या  अहंकारी टाकीवर रागवला नाही. उलट तिला शांत ठेवणसाठी, थंड होणसाठी आपल्या सहस्र हातांनी तिला आच्छादितच ठेवत राहिला! 
 
तित्या उदरात आपल्या पानांनाही कधी पडू देत नसे! पणतिला कुठे राहिली आठवण, त्या पिंपळपानांची.. 
 
अं.. ! हे असंच असतं. आपल्या घरातल्या कर्त्यापुषाचं! हं... असंच असतं.. असो, हे पिंपळपान कधी कधी त्या   भीष्मासारखे वाटते; अजीव-अभंग आणि नवजीवन देणारे, प्रत्येक क्षणाला!
 
विठ्ठल जोशी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

UPI ​​व्यवहार शुल्काबाबत अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण: सर्वसामान्यांसाठी P2P व्यवहार पूर्णपणे मोफतच राहणार!

झारखंडमध्ये भरती परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात आंदोलन पेटले

Independence Day 2026 Speech in Marathi १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिन भाषण मराठीत

टाटाची ६०० किमी रेंज असणारी ७-सीटर SUV, Safari.EV महिंद्रा XEV 9S ला देणार थेट टक्कर!

LIVE: शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

पुढील लेख
Show comments