Dharma Sangrah
✕

संत एकनाथ महाराज : तीन प्रेरणादायक प्रसंग

Updated: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (10:53 IST)
 
प्रसंग 2
उपकार आणि क्षमा
महाराष्ट्रात संत एकनाथ नावाचे एक तपस्वी महात्मा होऊन गेले. ते अनेक सद्गुणांनी परिपूर्ण होते. त्यांच्या क्षमा करण्याची भावना अद्भुत होती. एकदा ते नदीत स्नान करून आपल्या निवास स्थळाकडे जात होते. रस्त्यात जात असताना एका झाडावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्यावर खळखळून गुळणी केली. हे बघून ते एकही शब्द न बोलता पुन्हा अंघोळीसाठी नदीवर गेले. स्नान केल्यावर पुन्हा त्या झाडाखालून जाताना त्या व्यक्तीद्वारे त्यांच्यावर थुंकण्यात आले. तेव्हा एकनाथ पुन्हा जाऊन स्नान करू लागले. 
 
एकनाथ वारंवार स्नान करून त्या झाडाखालून निघत असताना झाडावरील व्यक्ती त्यांच्यावर गुळण्या करीत होता. असे 108 वेळ घडले आणि झाडावर बसलेला दुष्ट व्यक्ती आपली नीचता दाखवत राहिला पण एकनाथांनी धैर्य सोडलं नाही आणि क्षमा यावर अटल राहिले.
 
त्यांनी एकदाही त्या व्यक्तीला काही म्हटले नाही. शेवटी दुष्ट व्यक्तीचे हृदय परिवर्तन झालं आणि त्याने महात्मांच्या चरणात वाकून म्हटले की महाराज माझ्या दुष्ट कृत्यासाठी मला माफ करा. माझ्यासारख्या पापी माणसाला तर नरकात देखील स्थान मिळणे संभव नाही. मी आपल्याला खूप त्रास दिला तरी आपण स्थिर राहिला. मला क्षमा करा महाराज.
 
तेव्हा महात्मा एकनाथांनी त्याला म्हटले की काळजी करण्याची गरज नाही. तुझ्यामुळे आज मला 108 वेळा स्नान करण्याचं सौभाग्य लाभलं.‍ तुझे कितीतरी उपकार आहे!
संताची ही वाणी ऐकून दुष्ट व्यक्तीला आपण केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटली.
 
प्रसंग 3
देवाची गुलामी करा
संत एकनाथांकडे आलेल्या एका व्यक्तीने म्हटले की- नाथ! आपले जीवन किती मधुर आहे. आम्हाला तर क्षणभर देखील शांती लाभतं नाही. कृपया मार्गदर्शन द्या.
तेव्हा नाथ म्हणाले की तू तर केवळ आठ दिवसांचा पाहुणा आहे, म्हणून पूर्वीप्रमाणेच आपलं जीवन व्यतीत करत राहा. 
हे ऐकून व्यक्ती उदास झाला.
 
तो घरी जाऊन पत्नीला म्हणाला की आजपर्यंत तुला उगाचच कष्ट दिले. त्यासाठी क्षमा असावी. नंतर मुलांना म्हणाला की तुमच्यावर अनेकदा हात उचलला आहे, त्यासाठी मला माफ करा. ज्या लोकांसोबत त्याने दुर्व्यवहार केला होता, त्या सर्वांकडे जाऊन त्याने क्षमा मागितली. या प्रकारे आठ दिवस सरले आणि नवव्या दिवशी तो एकनाथांकडे पोहचला आणि म्हणाला- नाथ, माझ्या शेवटल्या श्वासासाठी किती वेळ शेष आहे?
ती वेळ तर परमेश्वरच ठरवू शकतो, परंतू हे आठ दिवस कसे व्यतीत झाले ते आधी सांग? भोग-विलास आणि आनंद यात व्यतीत केले असतील? 
काय सांगावं नाथ, मला या आठ दिवसात मृत्यूव्यतिरिक्त काहीच दिसेनासे झाले. मला आपल्या हातून घडलेले सर्व दुष्कर्म आठवले आणि पश्चात्ताप करण्यातच वेळ निघून गेला.
 
मित्र, ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन तू हे आठ दिवस घालवले, आम्ही साधू तेच समोर ठेवून व्यवहार करतो. देह क्षणभंगुर आहे. देहाची माती होणार. देहाची गुलामी करण्यापेक्षा परमेश्वराची गुलामी करावी.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत दोन नवीन अभयारण्यांना मान्यता

महाराष्ट्रात पर्यावरण रक्षणासाठी मोठा उपक्रम, 2 नवीन वन्यजीव अभयारण्ये आणि 14 संवर्धन अभयारण्य घोषित

एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह करणार

५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात एसआयटीची स्थापना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुंबई पोलिसांची कारवाई

रेवंत रेड्डी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट, तेलंगणाच्या मागणीवर अभ्यास समिती स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची बैठक

पुढील लेख
Show comments