Dharma Sangrah
✕

World Kindness Day 2026: जागतिक दयाळूपणा दिवस

Updated: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2026 (10:50 IST)
जागतिक दयाळूपणा दिवस दरवर्षी १३ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. माणसांमध्ये प्रेम, आपुलकी, सहकार्य, करुणा आणि मदतीची भावना वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

समाजातील चांगल्या कामांना आणि दयाळूपणाला प्रोत्साहन देणे, तसेच वंश, धर्म, राजकारण आणि लिंग या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने एकत्र येणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात एकमेकांप्रती सहानुभूती, प्रेम आणि मदतीची भावना जिवंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दयाळूपणा दाखवण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते; एखाद्याला हसून अभिवादन करणे, गरजूला मदत करणे किंवा कोणाचे तरी म्हणणे शांतपणे ऐकून घेणे या छोट्या कृतींमधूनही हा दिवस साजरा करता येतो. तसेच पांढऱ्या हृदयाचे चिन्ह या चळवळीचे प्रतीक मानले जाते. या निमित्ताने आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतरांशी अधिक प्रेमाने आणि सहानुभूतीने वागण्याचा संकल्प करू शकतो.

जागतिक दयाळूपणा दिवसाचा इतिहास
- जागतिक दयाळूपणा दिवसाची सुरुवात १९९८ मध्ये झाली.
- World Kindness Movement या जागतिक चळवळीच्या पुढाकारातून हा दिवस सुरू करण्यात आला.या संस्थेची स्थापना १९९७ मध्ये जपानमधील टोकियो येथे झालेल्या परिषदेत जगभरातील विविध दयाळूपणावर काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन केली होती.
- जगभरातील लोकांमध्ये दयाळूपणा आणि सकारात्मकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या दिवसाचे महत्त्व
1. समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकता निर्माण करणे.
2. गरजू आणि वंचित लोकांना मदत करण्याची प्रेरणा देणे.
3. प्राणी आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलता वाढवणे.
4. द्वेष, भेदभाव आणि हिंसा कमी करण्यासाठी सकारात्मक विचार रुजवणे.
5. लहान-मोठ्या चांगल्या कृतींमधून आनंद पसरवणे.

दयाळूपणा व्यक्त करण्याचे सोपे मार्ग
- गरजू व्यक्तीला अन्न किंवा कपडे दान करणे.
- वृद्ध व्यक्तींना मदत करणे.
- प्राण्यांना अन्न आणि पाणी देणे.
- झाडे लावणे आणि पर्यावरणाची काळजी घेणे.
- एखाद्याचे मनापासून कौतुक करणे.
- दुःखी व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे.
- इतरांशी प्रेमाने आणि आदराने वागणे.

दयाळूपणाचा सुंदर संदेश
दयाळूपणा दाखवण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा मोठे काम करण्याची गरज नसते. एखाद्याला दिलेले प्रेमळ हास्य, मदतीचा हात किंवा दिलासा देणारे दोन शब्दसुद्धा एखाद्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करू शकतात.

"दयाळूपणा ही अशी भाषा आहे, जी प्रत्येकाला समजते आणि जी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करते."
१३ नोव्हेंबर २०२६ दिवस शुक्रवार आहे. चला, आजच्या दिवशी किमान एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा संकल्प करूया!

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"माझ्या भावाचे निधन झाले त्या दिवशी हा विषय संपला" सुप्रिया सुळे यांनी दोन गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या

मुंबई: कोस्टल रोड बोगद्यात सहा वाहनांची भीषण टक्कर, अनेक गाड्यांचे नुकसान

UAE मध्ये अनियंत्रित ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याने १४ जणांचा मृत्यू! मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोलीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार

शेतकऱ्याची मेहनत काही सेकंदांच्या रीलसाठी वाया गेली! नांदेडमध्ये उसाचे शेत फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे जळून खाक

पुढील लेख