शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (15:29 IST)

थोर लेखिका सावित्रीबाई

10 मार्च 2019, सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन. त्यातनिमित्त...
 
काव्य रचण्यात रममाण होणार्‍या सावित्रीबाई या उत्कृष्ट गद्यलेखिका होत्या. उपलब्ध गद्यलेखनावरून त्यांच्या लेखनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतात.
 
वैचारिक व सामाजिक विषांवरील लेखन
 
सावित्रीबाईंच गद्यलेखनाचे विषय हे प्रामुख्याने सामाजिक समस्यांवर आधारित आहेत. त्यांनी वाळवेकरांच्या 'गृहिणी' मासिकातून स्त्रियांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. त्यांच्या लेखांचे विषय प्रामुख्याने सामाजिक असून त्यात जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, विधवाविवाह, बालविवाह, शूद्र, अतिशूद्रांकरिता शिक्षण वगैरे विषयांचा समावेश होता.
 
लेखनाची प्रेरणा जोतिबा फुले 
 
सावित्रीबाई फुले यांचे व्यक्तिमत्तव घडविण्यात जोतिबा फुले यांचे मार्गदर्शन व कार्यकर्तृत्व प्रमुख आहे. जोतिबा हे सावित्रीबाईंचे पतीच नव्हते तर ते त्यांचे आदर्श शिक्षक व प्रेरणास्थान होते. आपले पती लेखन, वाचन व भाषण याद्वारे मोठी सामाजिक सेवा करीत आहेत व त्यांच्या समाजसुधारणाविषयक व स्त्री शिक्षणविषक कार्यात आपण काही ना काही हातभार लावणे हे सहधर्मचारिणी या नात्याने आपले पवित्र कर्तव्यकर्म आहे, याची सक्त जाणीव सावित्रीबाईंना होती, म्हणूनच सावित्रीबाईंच्या लेखनावर जोतिबांच्या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांना आपल्या लेखनाकरिता इंग्रजी किंवा अन् भाषेतील साहित्यातून विचारांची उसनवारी करावी लागली नाही. 
 
तर्कनिष्ठ आक्रमकता 
 
जोतिबा फुले यांच्याप्रमारे तर्कनिष्ठ आक्रमकता ही सावित्रीबाई फुले यांच्या गद्य लेखनातही आहे. त्यामुळे त्यांचे वैचारिक निबंध वाचनीय झाले आहेत. तर्काच्या आधारावर प्रतिपक्षाच्या विचारांना चोख उत्तर देणे व आपले म्हणणे वाचकांच्या गळी उतरविणे हा लेखनातील गुण सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या लेखनातूनच आत्मसात केला होता. या दृष्टीने फुले दाम्पत्य मराठी भाषेतील शैलीकार लेखक आहेत.
 
पत्रलेखनातील सावधानता 
 
पत्रलेखन हा मराठी भाषेतील एक वाङ्‌मयकार आहे. या लेखन प्रकाराची काही पथ्ये आहेत. ही पथ्ये सावित्रीबाईंना पत्रलेखन करताना उत्कृष्टरीत्या साध्य झाल्याचे दिसून येते. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली तीनच पत्रे उपलब्ध आहेत. या पत्रातून त्यांची सामाजिक कार्याची तळमळ व आशावाद दिसून येतो. प्रेयसीने प्रिकराला लिहिलेली ही पत्रे नसल्यामुळे येथील लिखाणातील सावधानता विलोभनी वाटते. सावित्रीबाईंनी आऊ, वडील व भाऊ यांनाही काही पत्रे लिहिली असावीत. पण ती सर्व उपलब्ध नाहीत. जिव्हाळच्या व्यक्तींना कौटुंबिक पत्रे कशी लिहावीत याचे मार्गदर्शन सावित्रीबाईंच्या या पत्रावरून होऊ शकते. ओतूर, जुन्नर येथून 20 एप्रिल 1877 ला सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेले पत्र दुष्काळाची भीषणता तर व्यक्त करतेच पण सावित्रीबाई सामाजिक कामात कसा पुढाकार घेत यावरही प्रकाश टाकते.
 
उत्कृष्ट संपादन
 
सावित्रीबाई यांना केवळ लेखिका म्हणूनच महत्त्व आहे असे नव्हे तर त्या उत्कृष्ट संपादिका देखील आहेत. त्यांनी जोतिबा फुले यांच्या भाषणांचा सारांश शिळाप्रेसवर 25 डिसेंबर 1856 मध्ये प्रसिद्ध केला. त्यात 4 भागात जोतिबांची भाषणे सावित्रीबाईंनी संकलित केली आहेत. जोतिबांची ही भाषणे त्यांचे विचार सजावून घेण्याकरिता अतिउपोगी आहेत. 
 
'अतिप्राचीन काळी', 'इतिहास' 'सुधारणूक' व 'गुलामगिरी' अशी शीर्षके या संपादित भाषणांची आहेत. मुख्य भाषणातील कोणता भाग प्रभावीपणे भांडावा, कोणता सोडावा, परिच्छेदांची रचना कशी करावी व त्यांना कोणती शीर्षके द्यावी हे चांगल्या संपादकाशिवाय इतरांना जमू शकत नाही. सावित्रीबाईंनी संपादित केलेल्या भाषणात हे सर्व गुण उतरले असल्यामुळे त्या थोर लेखिका या बरोबरच थोर संपादिकाही ठरतात.
 
बी. के. तळभंडारे