मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : मंगळवार, 14 एप्रिल 2020 (15:48 IST)

काय म्हणता , अॅमेझॉन तब्बल ७५ हजार जणांना नोकरी देणार

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन तब्बल ७५ हजार जणांना नोकरीची संधी देणार आहे. या जागा वेअरहाउस स्टाफ पासून डिलिव्हरी ड्रायवर्स या पदांपपर्यंत असणार आहेत. लॉकडाउनमुळे ७५ हजार जणांची भरती केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.
 
लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थांसह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे. त्यामुळे अतिरिक्त स्टाफ वाढवला जातोय. वाढत्या बेरोजगारीला पाहून अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.