सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (10:38 IST)

कोरोनाचा प्रभाव, फ्लिपकार्ट (Flipkart) ने सेवा बंद केल्यानंतर अ‍ॅमेझॉन (Amazon) ने ही घेतला मोठा निर्णय ...

चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या जगभरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्ट या देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीनेही आपल्या सेवा बंद केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आजपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. 
 
बातमीनुसार कंपनीने देशातील कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता आपल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे या प्रकारच्या कंपन्यांना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले आहे.
 
आजपासून कोणत्याही वापरकर्त्यांना फ्लिपकार्टहून ऑनलाईन खरेदी करता येणार नाही. दरम्यान, फ्लिपकार्टने आपल्या संकेतस्थळावर एक संदेश लिहिला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे, नमस्कार भारतीय - आम्ही आमच्या सर्व सेवा तात्पुरत्या आधारावर बंद करत आहोत. तुमची सेवा करणे आणि आम्ही तुम्हाला सांगणे आमचे प्राधान्य आहे की लवकरच आम्ही पुन्हा तुमची सेवा करताना दिसू.
दुसरीकडे अ‍ॅमेझॉननेही आपली अनावश्यक उत्पादनांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.