मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (13:39 IST)

फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप

फ्लिपकार्ट (Flipkart) चे सहसंस्थापक 38 वर्षीय सचिन बंसल यांच्या पत्नी प्रिया यांनी त्यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल केला आहे. बेंगलुरु पोलिसांप्रमाणे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांच्या पत्नीने कोरमंगला पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचं प्रकरण दाखल केलं आहे.
 
2008 मध्ये झाला होता विवाह
सचिन आणि प्रिया यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. आपल्या तक्रारीत प्रिया यांनी आरोप केला आहे की सचिन आणि सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केला. त्यांनी सांगितले की माझ्या वडिलांनी लग्नात 50 लाख रुपये खर्च केले होते आणि सचिन यांना 11 लाख रुपये कॅश दिले होते. 
 
बहिणीसोबत यौन उत्पीडन
प्रिया डेंटिस्ट आहे आणि त्यांनी पतीविरुद्ध मारहाण आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. मागील ऑक्टोबरमध्ये सचिनने मारहाण करत सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्याची मागणी केली. त्यांनी आरोप लावला की सचिन जेव्हा दिल्लीत होता तेव्हा तेथे त्यांनी तिच्या बहिणीचं यौन उत्पीडन केलं. सचिनच्या नावावर प्रॉपर्टी ट्रांसफर करण्यास नकार दिल्यावर त्यांनी माझ्या आई-वडील आणि भावाला परेशान केल्याचाही आरोप प्रिया यांनी केला आहे.