सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Updated : बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (19:10 IST)

DDA मध्ये सल्लागार पदांसाठी भरतीची शेवटची संधी,अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. दिल्ली विकास प्राधिकरण (DDA) मध्ये सल्लागार आर्किटेक्ट पदांसाठी भरती सुरू आहे. बुधवार, 09 फेब्रुवारी ही या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर, ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही,त्यांनी अर्जाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी जेणेकरून ही सुवर्णसंधी चुकू नये
 
दिल्ली विकास प्राधिकरणामध्ये, सल्लागार वास्तुविशारदाच्या पाच पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना DDA च्या अधिकृत वेबसाइट dda.org.in या संकेत स्थळाला ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर दिलेला भरती अर्ज भरून तेथे दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावा लागेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वेबसाइटवर जावे आणि भर्ती तपशीलांशी संबंधित अधिसूचना पूर्णपणे वाचली पाहिजे.
 
अर्जाशी संबंधित तपशीलवार माहिती उमेदवारांना अधिसूचनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2022 पर्यंत ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेदवार, या तारखेपर्यंत तुमच्या सर्व कागदपत्रांसह फॉर्म ईमेलवर पाठवा. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 
 
डीडीए भर्ती 2022 रिक्त जागा तपशील
* लँडस्केप आर्किटेक्ट वरिष्ठ सल्लागार - 02 पदे
* लँडस्केप आर्किटेक्ट सल्लागार - 03 पदे
 
DDA भर्ती 2022 मध्ये पगार -
* लँडस्केप आर्किटेक्ट वरिष्ठ सल्लागार - 65,000 रुपये प्रति महिना
* लँडस्केप आर्किटेक्ट सल्लागार – रुपये 45,000  प्रति महिना
 
DDA भर्ती 2022 साठी पात्रता -
लँडस्केप आर्किटेक्ट वरिष्ठ सल्लागार पदाच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून लँडस्केप आर्किटेक्चर अभियांत्रिकीमध्ये दोन वर्ष पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त नामांकित विद्यापीठातून आर्किटेक्चर अभियांत्रिकीमध्ये 05 वर्षे पूर्णवेळ बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. तर, सल्लागार लँडस्केप आर्किटेक्टच्या पदावरील भरतीसाठी, उमेदवाराने लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. लँडस्केप आर्किटेक्ट सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीवर आधारित असेल. अनुभवी अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल. 
 
DDA भर्ती 2022 अर्ज कसा करावा-
1 उमेदवार अधिकृत वेबसाइट dda.org.in वर क्लिक करा.
2 आता उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावर उपलब्ध नोकरी विभागावर क्लिक करा.
3 क्लिक केल्यानंतर नोकरी 2021-22 च्या विभागावर पुन्हा क्लिक करा.
4 आता उमेदवार लँडस्केप आर्किटेक्टच्या वरिष्ठ लँडस्केप आर्किटेक्ट आणि सल्लागार पदांच्या लिंकवर क्लिक करा.
5 या लिंकवर क्लिक केल्यानंतर PDF डॉक्युमेंट उघडेल.
6 यामध्ये पोस्ट तपशीलाशी संबंधित माहिती नीट वाचा.
7 पीडीएफ दस्तऐवजात उपलब्ध असलेला अर्ज लिखित स्वरूपात भरा.
8 अर्ज लिखित स्वरूपात भरल्यानंतर ते PDF दस्तऐवजात रूपांतरित करा.
9 फॉर्म योग्यरित्या भरल्यानंतर उमेदवार [email protected] या संकेत स्थळावर पाठवा.