सध्या हिवाळ्यामुळे गुलाबी थंडी पडू लागली आहे. हिवाळ्यात सगळ्यात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजे कपड्याची. कितीही महागडे आणि फॅशनेबल कपडे परिधान केले तरी त्यांचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण स्वेटरच्या खाली ते झाकले जातात.
हिवाळ्यात येणार्या उबदार कपड्यांमधूनही आता फॅशन डोकावू लागली आहे. बोचणार्या थंडीपासून बचावासाठी नव्हे तर इतरापेक्षा आपण वेगळे दिसावे यासाठी महिला स्वेटर परिधान करीत असतात. उबदार कपड्यात महिला जाडसर दिसतात. त्यामुळे आपल्याला शोभेल व थंडीही वाजणार नाही, असे उबदार कपडे त्या शोधत असतात.
महिलांसाठी काही टिप्स-
हिवाळ्यात तुम्हाला तुमचा आवडता स्कर्ट परिधान करायचा असेल तर पाय झाकण्यासाठी स्टॉकिंग्ज घाला. यामुळे तुमच्या पायांचे थंडीपासून रक्षण होइल व तुम्ही स्लीम व सुंदर दिसाल.
नेहमी आपल्या फिगरनुसार उबदार स्वेटर किंवा जॅकेट खरेदी करा. परंतु जास्त सैल अथवा तंग घेऊ नका.
हिवाळ्यात थर्माकोट परिधान करणे फायदेशीर असते. कारण त्याने तुम्हाला थंडीची तीव्रता कमी जाणवेलच परंतु, आपले स्टाइल स्टेटमेंटही कायम राखता येईल.
हिवाळ्यातील उबदार कपडे देखील तुम्ही फॅशनेबल बनवू शकतात. हायनेक स्वेटर व कोट यांच्यासोबत रंग-बिरंगी मफलर, मोत्यांची लांब माळ, ब्रेसलेट आदी 'ट्राय' करून 'डिफरंट लूक' देऊ शकतात.