मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (15:23 IST)

चिनी लोक घरात हे 5 उपाय करतात, म्हणून एवढे श्रीमंत असतात

1. बॉन्सायी वनस्पती
चिनी लोक बॉन्सायी बांबूचे झाड त्यांच्या घरी लावतात. फेंगशुईच्या विशेषज्ञांचे म्हणणे आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने प्रगती आणि आनंद येतो. त्यामुळे आपण ते आपल्या घरात देखील ठेवावे. सर्वात खास गोष्ट म्हणजे ते आपल्या घराच्या सौंदर्यात चार रंग आणतील. असं म्हणतात की या वनस्पती जितक्या प्रमाणात वाढतात तसतसे घरामध्येही समृद्धी वाढते.
 
2. फुक लुक साऊ
फुक लुक आणि साऊ फेंगशुईचे तीन देवता आहे. अनुक्रमाने हे दीर्घ आयुष्य, भाग्य आणि संपत्तीचे देव आहे. त्यांना पूर्व किंवा उत्तर दिशेने घरात ठेवावे. घरामध्ये ते अशा प्रकारे ठेवले जातात की घरातून बाहेर निघता आणि प्रवेश करताना त्यांचे दर्शन व्हायला पाहिजे.
 
3. कासव
एका वर बसलेले एक तीन कासव आनंद, शांती आणि वैभव यांचे प्रतीक आहे. यामध्ये सर्वात खाली असलेल्या कासवाला वडील, त्याच्या वरच्‍या कासवाला आई आणि सर्वात वरच्या कासवाला त्यांचा मुलगा मानला जातो. असा विश्वास आहे की हे घरामध्ये ठेवल्याने एकानंतर एक यश चालून येत.
 
4. बेडूक
चीनमधील प्रत्येक घरात किंवा बागेत एक बेडूक नक्कीच असतो. हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. येथे लोक तीन पाय असलेल्या बेडकाची मूर्ती किंवा चिन्ह घरात ठेवले जातात ज्याच्या तोंडात नाणं दबलेलं असत. हे घराच्या दारात किंवा बाहेरील भागात ठेवावे. विसरून ही ह्याला घराच्या आत ठेवू नये. असा विश्वास आहे की ह्याला घराच्या आत ठेवल्याने लक्ष्मी घरापासून दूर जाते.
 
5. पेश्याने भरलेली टोकरी
फेंगशुईच्या मते पिग्गी बँकला घराच्या उत्तर-पश्चिम दिशेत ठेवल्याने लक्ष्मी घरात येते. पण याला आपण लपवून ठेवा. चीनमधील लोक पिग्गी बँकचा शोपीससुद्धा घरात ठेवतात. असे मानले जाते की घरामध्ये हे ठेवल्याने पैशांची बचत होते. हे भौतिक खर्च पण वाचवतो.