सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (10:24 IST)

लांब मान असलेला प्राणी 'जिराफ'

* जिराफचे वजन सुमारे 1400 किलो असतं. 
* याची मान सुमारे 1.5 ते 1.8 मीटर एवढी लांब असते. 
* याच्या शेपटीचे केस माणसाच्या केसांपेक्षा 10 पटीने जास्त जाड असतात.
* नर आणि मादी जिराफ, दोघांना शिंग असतात आणि नर जिराफला 3 शिंग असतात.
* मादी जिराफ उभारून मुलाला जन्म देते. जन्माच्या वेळी मूल सुमारे 6 फूट उंची वरून पडतो पण त्याला लागत नाही.
* नर जिराफ आपल्या मानेचा वापर करून लढतो.
* जिराफच्या शरीरावर असलेले डाग एका कॅमॉफ्लाझ प्रमाणे काम करतं. जेणे करून शिकारी पासून त्यांचे संरक्षण होत.
* जिराफला चार पोट असतात ज्या मुळे त्यांची पचन शक्ती चांगली असते. 
* जिराफ पाणी पिताना वाकतात त्यामुळे त्यांच्यासाठी शिकारी पासून वाचणं अवघड असतं कारण ते त्यांना बघू शकत नाही.
* जिराफच्या जिभेत कडक केस असतात जे त्यांना काटेरी झाडाचे पाने खाण्यात मदत करतं. 
* ज्या प्रकारे माणसांचे ठसे एकसारखे नसतात त्याच प्रमाणे जिराफाच्या शरीरावर असलेल्या डागांचे स्वरूप देखील वेगवेगळे असतात.