रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: सोमवार, 14 जानेवारी 2019 (15:32 IST)

कंबाला आणि थोडा

कर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. हिरवीगार शेतं आणि चिखलाने माखलेल्या रस्त्यांवरून म्हशी आणि रेडे धावतात. शेतकरी आपल्या सर्वात वेगवान म्हशी किंवा रेड्यांच्या जोडीसह शर्यतीत उतरतात. ही शर्यत पाहायला येणारे लोक स्पर्धकांना प्रोत्साहन देतात. यावेळी बघ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला असतो. पूर्वीच्या काळात म्हशी सुरक्षित ठेवल्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी एक विधी होत असे. आता त्याची जागा स्पर्धेने घेतली आहे. 
 
चीन, जपानमध्ये मार्शल आर्टस्‌चे प्रकार लोकप्रिय आहेत. आता या क्रीडाप्रकारात भारतही मागे नाही. 'थोडा' हे हिमाचल प्रदेशातलं मार्शल आर्ट. यात खेळाडूच्या धनुर्विध्येतल्या कसबाचा अंदाज घेतला जातो. याची संकल्पना महाभारत युद्धातून घेण्यात आली आहे. यात स्पर्धकांची दोन गटांमध्ये विभागणी केली जाते. हे दोन गट कौरव आणि पांडवांचं प्रतिनिधित्त्व करतात. त्यांना साथी आणि पाशी असं म्हटलं जातं. या खेळात स्पर्धक दुसर्‍या संघातल्या खेळाडूंच्या पायांवर बाण मारतात. बाणाच्या पुढच्या बाजूला लाकडी तुकडा बसवण्यात आल्याने इजा होत नाही. या तुकड्याला थोडा म्हटलं जातं. बाण गुडघ्यांखाली मारला जातो. स्पर्धा सुरू असताना संगीतही वाजवलं जातं.