बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मे 2018 (11:45 IST)

किड्‌स अ‍ॅपवर आता पालकांना मिळेल नियंत्रण

मुलांना यूट्युबवर चुकीचा कंटेंट दिसू नये यासाठी गुगल खूप आधीपासून काम करत आहे. अलीकडेच कंटेंट वादानंतर गुगलने व्हिडिओ प्लेटफार्मवर नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. यात पालकांना मुले बघत असलेले चॅनल्स आणि व्हिडिओज नियंत्रित करण्याची अनुमती मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी चाईल्ड सेफ्टी ऑर्गनाइजेशन ग्रुप्सने अ‍ॅण्ड फेडरल ट्रेड कमिशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यूट्युब किडस्‌ प्लेटफार्मच्या माध्यमातून मुलांचा टेडा कलेक्ट केला जात आहे.
 
यूट्युब किड्‌स अ‍ॅपसोबत कंटेंट वाद समोर आला होता. बिझनेस इनसाईडरच्या रिपोर्टनुसार, मून लेंडिंगचा व्हिडिओ सर्च केल्यावर दुसर्‍या गोष्टी समोर येत आहेत. कारण व्हिडिओ प्लेटफार्मवरून व्हिडिओज हटवण्यात आले आणि अ‍ॅपच्या माध्यमातून काही चॅनल्सही ब्लॉक करण्यात आले.
 
या महिन्याच्या सुरुवातील युट्यूबने लहान मुलांच्या अ‍ॅपवर कंटेंट नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. आता या अ‍ॅपमध्ये बदलही करण्यात येत आहे. यामध्ये पालक कंटेंट स्वीकारु शकतात आणि अ‍ॅपमध्येही सर्च ऑप्शन बंद करु शकतात. त्याचबरोबर सजेस्टेड व्हिडिओज फक्त ठरावीक चॅनल्ससाठी असतील. जे इंटरनल टीमद्वारा तपासण्यात येतील.