सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

घरात काळ्या मुंग्या असण्याचे संकेत

घरात आपण सतत स्वच्छता करत असला तरी घरात मुंग्या होतात आणि या मुंग्या काळ्या रंगाच्या असल्या तर हे शुभ किंवा अशुभ संकेत असू शकतात. 
 
ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरात मुंग्या असतील जीवनात काही वेगळे घडणार असल्याचे संकते आहे समजावे. घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर त्या ऐश्वर्य आणि धन वृद्धीचे संकेत देतात. परंतू मुंग्या अधिक प्रमाणात असल्या तर कुटुंबात मतभेद होऊ शकतात म्हणून मुंग्यांना साखर टाकावी. याचा एक अर्थ तर हा आहे की कमी संख्येत मुंग्या असणे सुख, शांती आणि समृद्धीसाठी सकरात्मक संकेत आहे. परंतू अधिक संख्येत मुंग्या असल्यास घराबाहेर गूळ ठेवावे. याने घरातील मुंग्या नाहीश्या होतील. तसेच एक उपाय हा देखील आहे की काळ्या मुंग्या लक्ष्मीचा रुप मानल्या गेल्या आहे अशात काळ्या मुंग्यांचे झुंड दिसल्यास त्यांना हळद- कुंकुं वाहण्याची प्रथा आहे. यानंतर शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र नेसून लक्ष्मीची उपासना करावी, असे करणे लाभदायक ठरेल.
 
तसेच नवीन घराची नीव ठेवताना तेथे काळ्या मुंग्या दिसणे शुभ आहे. मुंग्यांचा झुंड असल्यास आधी त्यांना कणिक टाकावी नंतर काम सुरु करावे. पुन्हा येथे सांगत आहोत की कमी मुंग्या दिसणे लाभकारी तर जास्त प्रमाणात मुंग्या दिसणे संकट येण्याची शक्यता दर्शवतं म्हणजे अचानक घरात दाणे एकत्र करत असलेल्या मुंग्या दिसू लागल्या तर संकट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या व्यतिरिक्त अचना रांगेत अधिक संख्येत मुंग्या चालत असल्या तर पावसाचे संकेत आहे. या व्यतिरिक्त नमकीन पदार्थांमध्ये मुंग्या लागल्यास वाईट काळ येण्याचे संकेत असतं.
 
तसेच घरात लाल मुंग्या असल्यास आजार किंवा संकटाचे संकेत असल्यामुळे मुंग्यांना साखर टाकावी. त्रास कमी होण्याची शक्यता असते.