शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

शुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एकदम सोपे 5 उपाय

पत्रिकेत जर शुक्र ग्रह अशुभ स्थितीत असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण सुख-सुविधा मिळत नाही. तसेच, वैवाहिक जीवनात बर्‍याच अडचणींना समोर जावे लागते. शुक्राचे दोष दूर करण्यासाठी शुक्रवारी विशेष उपाय केले जातात. शास्त्रानुसार शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या निमित्ताने देखील उपाय करू शकता. पहा लहान लहान 5 उपाय...
 
1. दर शुक्रवारी शिवलिंग वर दूध आणि पाणी अर्पित करा. तसेच, ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करा. मंत्राचा जप किमान 108 वेळा करायला पाहिजे. मंत्र जपासाठी रुद्राक्षाच्या माळेचे उपयोग करायला पाहिजे.  
2. एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा मंदिरात दुधाचे दान करावे.  
3. शुक्रवारी एखाद्या विवाहित स्त्रीला सौभाग्याचे सामान दान करावे. सौभाग्याचे सामान अर्थात बांगड्या, कुंकू, लाल साडी. या उपायाने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते.  
4. शुक्रापासून शुभ मिळवण्यासाठी शुक्रवारी शुक्र मंत्राचा जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असायला पाहिजे. शुक्र मंत्र: द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:. 
5. शुक्र ग्रहासाठी या वस्तूंचे देखील दान करू शकता ... हिरा, चांदी, तांदूळ, खडीसाखर, पांढरे वस्त्र, दही, पांढरे चंदन इत्यादी . या वस्तूंचे दान केल्याने शुक्र दोष कमी होतात.