रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

भृगु संहिताच्या माध्यमाने जाणून घ्या कोणच्या वयात होईल तुमचे भाग्योदय

भृगु संहितांद्वारे जाणून घ्या की कोण कोणत्या वयात तुमचे भाग्योदय होऊ शकत.  भाग्य किंवा लक असे शब्द आहे, ज्यांचे आमच्या जीवनात जास्त प्रभाव मानला जातो. कुठल्याही प्रकारचे सुख-दुःख, यश -अपयश, अमिरी-गरिबीला भाग्याने जोडून बघण्यात येते. सर्व लोकांना जाणून घ्यायचे असते की आमचा चांगला काळ केव्हा येणार आहे.? केव्हा आमच्याजवळ भरपूर पैसा येईल? या प्रश्नांचे उत्तर भृगु संहितेत सांगण्यात आले आहे. हा एक असा ग्रंथ आहे, ज्यात ज्योतिष संबंधी सर्व माहिती देण्यात आली आहे. या संहितेत कुंडलीच्या लग्नानुसार देखील सांगण्यात आले आहे की व्यक्तीचे भाग्योदय केव्हा होईल?
 
कुंडलीत असतात बारा भाव  
कुंडलीत बारा भाव असतात आणि ह्या 12 राश्या (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, कुंभ आणि मीन)चे प्रतिनिधित्व करतात. कुंडलीचा पहिला भाव अर्थात कुंडलीच्या केंद्र स्थानात पहिला घर ज्या राशीचा असतो, त्याच राशीनुसार कुंडलीचे लग्न निर्धारित होत. लग्नाच्या आधारावर पत्रिका बारा प्रकारच्या असतात.  
 
आपल्या कुंडलीचा पहिला भाव अर्थात लग्न बघा आणि येथे जाणून घ्या की कोण कोणत्या वयात तुमचे भाग्योदय होऊ शकत...  

मेष लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली मेष लग्नाची आहे, सामान्यतः: त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात किंवा 22 वर्षाच्या वयात, 28 वर्ष, 32 वर्ष किंवा 36 व्या वर्षात होऊ शकतो.  
 
वृषभ लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली वृषभ लग्नाची असेल , त्यांचा भाग्योदय 25 वर्षाचे वय, 28, 36 किंवा 42 वर्षाच्या वयात भाग्योदय होऊ शकत.  
 
मिथुन लग्नाची कुंडली
मिथुन लग्नाची कुंडली असणार्‍या लोकांचे भाग्योदय करणारे वय आहे 22, 32, 35, 36 वर्ष किंवा 42 वर्ष. या वर्षांमध्ये मिथुन राशीच्या लोकांचे भाग्योदय होऊ शकत.  
 
कर्क लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली कर्क लग्नाची आहे, त्यांचे भाग्योदय 16 वर्षाचे वय, 22, 24, 25, 28 वर्ष किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
सिंह लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली सिंह लग्नाची आहे, त्यांचा भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22, 24, 26, 28 वर्षाच्या वयात किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकतो.  
 
कन्या लग्नाची कुंडली 
कन्या लग्नाची कुंडली असणार्‍या लोकांचे भाग्योदय या वर्षांमध्ये होऊ शकत - 16 वर्ष, 22 वर्ष, 25 वर्ष, 32 वर्ष, 33 वर्ष, 35 वर्ष किंवा 36 वर्ष.  
 
तुला लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली तुला लग्नाची आहे, त्यांचे भाग्योदय 24 वर्षाच्या वयात होऊ शकत. जर 24 वर्षाच्या वयात भाग्योदय नाही झाले तर त्यानंतर 25 वर्षात, 32, 33 वर्ष किंवा 35व्या वर्षात होण्याची शक्यता असते.  
 
वृश्चिक लग्नाची कुंडली
वृश्चिक लग्नाची कुंडली असणार्‍या लोकांचे भाग्योदय 22 वर्ष, 24 वर्ष, 28 वर्ष किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
धनू लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली धनू लग्नाची आहे, त्यांचे भाग्योदय 16 वर्ष, 22 वर्ष किंवा 32 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
मकर लग्नाची कुंडली 
मकर लग्नाची कुंडली असणार्‍या लोकांचे भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 33 वर्ष, 35 वर्ष किंवा 36 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
कुंभ लग्नाची कुंडली
ज्या लोकांची कुंडली कुंभ लग्नाची आहे, त्यांचे भाग्योदय 25 वर्षाच्या वयात, 28 वर्ष, 36 वर्ष किंवा 42 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
मीन लग्नाची कुंडली 
मीन लग्नाच्या कुंडलीतील लोकांचे भाग्योदय 16 वर्षाच्या वयात, 22 वर्ष, 28 वर्षाच्या वयात किंवा 33 वर्षाच्या वयात होऊ शकत.  
 
लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे येथे फक्त कुंडली लग्नाच्या आधारावर भाग्योदयाचे संभावित वय सांगण्यात आले आहे. कुंडलीतील सर्व 9 ग्रहांची स्थिती आणि योगच्या आधारावर हे फलादेश बदलू देखील शकतात.