Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च महिन्यात 4 ग्रहांचे वेगवेगळ्या राशींमध्ये गोचर, 3 राशींच्या जातकांना सावध राहण्याची गरज

Updated: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (15:31 IST)
 
या मार्चमध्ये चार ग्रह राशींमध्ये भ्रमण करणार आहेत, त्यामुळे तीन राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप त्रासदायक ठरू शकतो. मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य काही राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा परिस्थितीत तीन राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्या 3 राशींची नावे ज्यांना मार्चमध्ये सावध राहण्याची गरज आहे.
 
तूळ- तूळ राशीच्या जातकांनी मार्च महिन्यात जरा सांभाळून वागावे. या महिन्यात ग्रह गोचरचा त्यांच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. कामात अडथळे आणि करिअरमध्ये संघर्ष अधिक होतील. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र, शनि आणि सूर्य 5 व्या घरात तूळ राशीत असतील, याचा अर्थ या राशीच्या लोकांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात. आपल्या प्रत्येक पावळावर अडथळे आणि अधिक मेहनतीची गरज भासेल. हा महिना आपल्या कौटुंबिक जीवनाच्या हिशोबाने जरा गुंतागुंतांनी भरलेले असू शकते. चांगली वेळ हवी असल्यास लक्ष्मी स्रोत पाठ करावा. या उपायाने आपले संघर्ष कमी होऊ शकतात.
 
धनू- धनु राशीच्या लोकांना मार्चमध्ये अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. ग्रहांचे संक्रमण या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात दुःख आणि समस्या आणू शकते. मुलांशी संबंधित चिंता तुम्हाला त्रास देऊ शकतात. या महिन्यात केवळ कठोर परिश्रमच तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतात. मनात चुकीचे विचार येऊ शकतात आणि मन अस्वस्थ राहू शकते. इच्छा नसतानाही तुमचा खर्च खूप वाढू शकतो. नोकरदार लोकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलणे महत्त्वाचे आहे. मार्च महिना चांगला राहावा यासाठी दररोज नारायण पाठ करावा. शुभ फल मिळून प्रलंबित कामे पूर्ण होतील.
 
मीन- मीन राशीच्या लोकांनी मार्च महिन्यात काळजी घेणे आवश्यक आहे. मीन राशीच्या लोकांना ग्रहांच्या राशी बदलामुळे काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक खर्च आणि अनावश्यक ताण येऊ शकतो. घरामध्ये आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तुमच्या नातेवाईकांशी तुमचे संबंधही बिघडू शकतात. शनीचा तुमच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. या महिन्याचे अशुभ परिणाम दूर करण्यासाठी रोज पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्याव्यात.

सर्व पहा

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

Sampat Shanivar Katha संपत शनिवारची कहाणी

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

रक्षाबंधनाला राखी बांधायची राहून गेली? 'या' ४ शुभ तिथींना बांधू शकता भावाला राखी

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments