राहू काळात पूजा किंवा मंत्र जप करावा की नाही, जाणून घ्या

Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:23 IST)
राहू काळात पूजा मंत्र जप करावे किंवा नाही, राहुकाळ अखेर असतो तरी काय? राहुकाळात निषिद्ध कार्ये काय आहेत ते जाणून घेऊ या.

काय असतो राहू काळ : राहू काळ हे स्थळ आणि तिथीनुसार वेगवेगळे असतात. म्हणजे दर वेळी वेगवेगळ्या काळात सुरू होतो. हा काळ कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी येतो, पण संध्याकाळी जरी आला तरी तो सूर्यास्ताच्या पूर्वीच येतो. राहू काळाची कालावधी दिवसाच्या 8 व्या भागा इतकी (सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत) म्हणजे राहू काळाची कालावधी दीड तासाची असते. या साठी दररोज 90 मिनिटाचा ठराविक काळ असतो. हा राहू काळ म्हणवतो. राहू काळ हे दिनमानाच्या आठव्या भागाचे नाव आहे. राहू काळाची वेळ एखाद्या ठिकाणच्या सूर्योदय आणि वारा वर अवलंबून असतं.

राहू काळ कधी कधी असतो?
रविवारी सायंकाळी 4.30 ते 6.00 पर्यंत,
सोमवारी सकाळी 7.30 ते 9 वाजे पर्यंत
मंगळवारी दुपारी 3.00 ते 4.30 पर्यंत, बुधवारी दुपारी 12.00 ते 1.30 वाजे पर्यंत
गुरुवारी दुपारी 1.30 ते 3.00 वाजे पर्यंत
शुक्रवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजे पर्यंत
आणि शनिवारी सकाळी 9.00 ते 10.30 वाजे पर्यंत ची वेळ राहू कालावधीची मानली जाते.

राहू काळाचा विचार दिवसातच करतात. काही लोकं रात्रीत देखील राहू काळ मानतात. पण हे योग्य नाही. राहू काळाचा विशेष विचार नेहमी रविवारी, मंगळवारी आणि शनिवारी आवश्यक मानले जाते. बाकीच्या दिवसात राहुकाळाचा प्रभाव विशेष नसतो.
राहू काळात काय करू नये -
1 या काळात यज्ञ, पूजा-पाठ करू नये, त्या मागील कारण असं की या काळात केलेली पूजा, ध्यान फलित होतं नाही.

2 या काळात नवीन व्यवसायाला सुरू करू नये.

3 या काळात कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये.

4 जर आपण या कालावधीत कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये. जर जाणं आवश्यक असल्यास तर पान, दही, किंवा काही गोड खाऊन घराच्या बाहेर पडावे. घरातून निघण्यापूर्वी 10 पावलं उलटे चालावे नंतर प्रवासासाठी निघावं.
5 या काळात खरेदी विक्री करू नये. या मुळे तोटा संभवतो.

6 राहू काळात लग्न, साखरपुडा, धार्मिक कार्य जसे की वास्तू शांत गृह प्रवेश सारखे शुभ कार्ये करू नये. जर एखादे शुभ कार्य करावयाचे असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृत पिऊनच करावं.

7 या काळात केलेले कोणते ही शुभ कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतं नाही. म्हणून या काळात शुभ कार्ये करू नये.

8 राहुकाळच्या दरम्यान अग्नी, प्रवास, कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये. पुस्तक लिहिणे बहीखात्याचे काम करू नये.

9 राहू काळात वाहन, घर, मोबाईल, कॉम्पुटर, टेलिव्हिजन, दागिने आणि इतर कोणतीही मौल्यवान वस्तू विकत घेऊ नये.

10 काही लोकांचा विश्वास आहे की राहुकाळात केलेले कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात.

काय करू शकतो -
1 या काळात राहूशी निगडित काम सुरू करू शकतो.
2 राहू ग्रहाच्या शांतीसाठी किंवा राहू दोष दूर करण्यासाठी धार्मिक मंत्र पाठ करावे.
3 कालसर्पाचा दोषाच्या शांती साठी उपाय करू शकता.
4 राहू चे यंत्र धारण किंवा राहू यंत्र दर्शन कार्य देखील करू शकतो.
5 ध्यान भक्तीच्या व्यतिरिक्त शांत राहू शकतो.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री विन्ध्येश्वरी चालीसा

श्री विन्ध्येश्वरी चालीसा
नमो नमो विन्ध्येश्वरी, नमो नमो जगदम्ब । सन्त जनों के काज हित, करतीं नहीं विलम्ब ...

श्री विन्ध्येश्वरी आरती

श्री विन्ध्येश्वरी आरती
सुन मेरी देवी पर्वत वासिनी, तेरा पार न पाया ॥ टेक ॥ पान सुपारी ध्वाजा नारियल, ले तेरी ...

श्री लक्ष्मी स्तोत्रम्

श्री लक्ष्मी स्तोत्रम्
ऋषि अगस्त्यकृत महालक्ष्मीस्तोत्रम् । पद्मे पद्मपलाशाक्षि जय त्वं श्रीपतिप्रिये ...

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, ...

Apara ekadashi 2022 :आज अपरा एकादशीचे व्रत आहे, हे केल्याने ...

Apara ekadashi 2022 :आज अपरा एकादशीचे व्रत आहे, हे केल्याने होतो प्राप्त भगवान विष्णूचा आशीर्वाद
भगवान विष्णूचा आशीर्वाद घेणाऱ्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. महिध्वज नावाचा एक देवभक्त ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...