Dharma Sangrah

राहू काळात पूजा किंवा मंत्र जप करावा की नाही, जाणून घ्या

Updated: शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (09:27 IST)
शुक्रवारी सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजे पर्यंत
आणि शनिवारी सकाळी 9.00 ते 10.30 वाजे पर्यंत ची वेळ राहू कालावधीची मानली जाते.
 
राहू काळाचा विचार दिवसातच करतात. काही लोकं रात्रीत देखील राहू काळ मानतात. पण हे योग्य नाही. राहू काळाचा विशेष विचार नेहमी रविवारी, मंगळवारी आणि शनिवारी आवश्यक मानले जाते. बाकीच्या दिवसात राहुकाळाचा प्रभाव विशेष नसतो.
 
राहू काळात काय करू नये -
1 या काळात यज्ञ, पूजा-पाठ करू नये, त्या मागील कारण असं की या काळात केलेली पूजा, ध्यान फलित होतं नाही. 
 
2 या काळात नवीन व्यवसायाला सुरू करू नये.
 
3 या काळात कोणत्याही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये.

4 जर आपण या कालावधीत कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये. जर जाणं आवश्यक असल्यास तर पान, दही, किंवा काही गोड खाऊन घराच्या बाहेर पडावे. घरातून निघण्यापूर्वी 10 पावलं उलटे चालावे नंतर प्रवासासाठी निघावं.
 
5 या काळात खरेदी विक्री करू नये. या मुळे तोटा संभवतो.
 
6 राहू काळात लग्न, साखरपुडा, धार्मिक कार्य जसे की वास्तू शांत गृह प्रवेश सारखे शुभ कार्ये करू नये. जर एखादे शुभ कार्य करावयाचे असल्यास हनुमान चालीसा वाचून पंचामृत पिऊनच करावं.
 
7 या काळात केलेले कोणते ही शुभ कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होतं नाही. म्हणून या काळात शुभ कार्ये करू नये.
 
8 राहुकाळच्या दरम्यान अग्नी, प्रवास, कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये. पुस्तक लिहिणे बहीखात्याचे काम करू नये. 
 
9 राहू काळात वाहन, घर, मोबाईल, कॉम्पुटर, टेलिव्हिजन, दागिने आणि इतर कोणतीही मौल्यवान वस्तू विकत घेऊ नये. 

10 काही लोकांचा विश्वास आहे की राहुकाळात केलेले कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात.
 
काय करू शकतो - 
1 या काळात राहूशी निगडित काम सुरू करू शकतो.
2 राहू ग्रहाच्या शांतीसाठी किंवा राहू दोष दूर करण्यासाठी धार्मिक मंत्र पाठ करावे. 
3 कालसर्पाचा दोषाच्या शांती साठी उपाय करू शकता.
4 राहू चे यंत्र धारण किंवा राहू यंत्र दर्शन कार्य देखील करू शकतो.
5 ध्यान भक्तीच्या व्यतिरिक्त शांत राहू शकतो.

सर्व पहा

Bail Pola 2026 यंदा बैल पोळा कधी? तारीख, पूजा विधी आणि शुभेच्छा संदेश

वक्रतुण्ड सहस्रनाम स्तोत्रम् : श्रीगणेशाच्या १००० नामांचे पठण

गणपतीचे वाराचे अभंग

Jyeshtha Gauri 2026 यंदा ज्येष्ठा गौरी आवाहन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि या तीन दिवसांमागची कथा

श्रीऋण-हरण-कर्तृ-गणपति-स्तोत्र-मन्त्र; श्री गणेश मंत्राच्या जपाने मिळवा सर्व ऋणांतून मुक्ती!

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

पुढील लेख
Show comments