Daily Horoscope
✕

मूलांक 9 स्वरूपाने आकर्षक असतात

Updated: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (11:14 IST)
 
birth 9व्यक्तिमत्व- यांचे व्यक्तिमत्व खूपच तेजपूर्ण आणि ऊर्जायुक्त असते. कठोर परिश्रमांना ते घाबरत नाहीत. यांची संकल्पशक्ती खूपच प्रबळ असते. यांच्यात आक्रमकपणा आणि क्रोध सहज दिसतो. संतापावर त्यांना नियंत्रण ठेवता येत नाही. चलाखपणा त्यांना जमत नाही. दूरदृष्टी त्यांच्यात क्वचितच आढळते. मूलांक ९ हा सत्ता, शक्ती, शौर्य आणि साहसाचा अंक आहे. शासन आणि प्रशासकीय प्रवृत्ती त्यांच्यात सहज आढळते. ते सहज संतापतात आणि भाषेवरचं नियंत्रण गमावून बसतात. पण नंतर लगेच आपली चूक सुधारण्याचा प्रयत्नही करतात. इतर लोक यांच्या कठोर इच्छाशक्तीला अहंकार समजतात, परिणामी त्यांना खूप शत्रू निर्माण होतात.  
  
भाग्यशाली तिथी- प्रत्येक महिन्याची ३, ६, ९, १२, १५, १८, २१, १४, २७ आणि ३० तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.
 
भाग्यशाली दिवस- प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार आणि गुरुवार तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. 
 
शुभ रंग- ऑरेंज रंग तुमच्यासाठी अतिशुभ आहे. याशिवाय पिवळा, गुलाबी, क्रीम व सफेद रंग शुभ आहेत. महत्त्वपूर्ण कामांसाठी लाल रंगाचा वापरही शुभ ठरेल. 
 
भाग्यशाली वर्ष- ९, १२, १५, १८, २१, २४, २७, ३०, ३३, ३६, ४२, ४५, ५१, ५४ आणि ६०वे वर्ष तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि भाग्यशाली ठरतील.
 
संबंधांसाठी शुभ अंक- मूलांक ३ आणि ४ यांच्याबरोबर तुमचे चांगले सामंजस्य राहील. मूलांक १, ४ आणि ८यांपासून तुम्हाला त्रास होऊ शकतो. 
 
भाग्यशाली दिशा- दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिशा तुमच्यासाठी शुभ ठरतील.
 
birthभाग्यशाली करिअर- प्रशासकीय कार्ये, सैन्य, शल्यक्रिया, धातू आणि अग्नीशी संबंधित कार्ये, वकिली, कायदेविषयक, अभिनय, जमीन खरेदी-विक्री, बिल्डिंग मटेरियलचा पुरवठा करणे तुमच्यासाठी यशस्वी करिअर ठरू शकते. 
 
भाग्यशाली देव- मंगळ, भूमी, सूर्य आणि शक्ती यांच्या उपासनेपासून तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. श्रावणात शिव आणि शक्तीची आराधना केल्यास तुमची खूप उन्नती होईल.
 
भाग्य रत्न- मूंगा आणि माणिक हे आपले भाग्य रत्न आहे. ५-५ कॅरेटच्या वजनाची रत्ने सोन्यात धारण करा. मानसिक शांतीसाठी चांदीमध्ये मोती धारण करणे चांगले राहील. 
 
कल्याणकारी मंत्र- ॐ अंगार काय नम
ॐ हौं जूं स
ॐ ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मै नम 
 
कल्याणकारी उपाय- संकटांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा. प्रश्नणायाम करावा. दररोज मातीच्या भांडय़ात तूपाचा दीवा लावा. चांदीचा चमचा वापरावा. स्टील आणि लोखंडाच्या चमच्यांचा वापर कमीतकमी करा.

सर्व पहा

गौरी पूजनात ऐनवेळी मासिक पाळी आली तर काय करावे? जाणून घ्या धार्मिक नियम, पर्याय आणि आरोग्य!

ज्येष्ठा गौरी: महानैवेद्याच्या ताटाची मांडणी व वाढण्याची पद्धत

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

Vishwakarma Jayanti 2026 Wishes in Marathi विश्वकर्मा जयंती शुभेच्छा मराठी

Gauri Geete in Marathi गौरी गणपतीची गाणी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments