शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (16:17 IST)

लिंबाने वाईट दृष्ट काढा

lemon
लिंबाचा वापर केवळ जेवणातील स्वाद वाढण्यासाठी नव्हे तर आरोग्यासाठी तसेच काही उपायांसाठी देखील केला जातो. होय, दृष्ट लागणे हा प्रकार आपण ऐकलाच असेल अशात लिंबाचा वापर करुन त्यावर उपाय करता येतो.
 
ज्यांच्या घरी लिंबाचं झाड असते त्याजवळ नकारात्मक ऊर्जा फटकत नाही. जर घरात झाड लावणे शक्य नसेल तर एक लिंबू पूर्ण घराभोवती 7 वेळा फिरवून त्या लिंबाला एकांत जागी जाऊन त्याचे चार तुकडे करुन फेकून द्यावे. तिथून परत येताना मागे वळून बघू नये.
 
घराला वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी - असे मानले जाते की आपण एखाद्याच्या वाईट नजरेपासून त्रस्त्र असाल तर त्यावर उपाय म्हणून दाराच्या मधोमध किंवा बाजूला लिंबू-मिरची लटकवून द्या. याने नकरात्मक ऊर्जा आत प्रवेश करु पात नाही.
 
यश प्राप्तीसाठी - अनेकदा मेहनत करुनही हवा तसा फायदा काही होत नाही. अशात आपण हनुमान मंदिरात लिंबू घेऊन जावा आणि तेथे त्यावर चार लवंगा लावून हनुमान चालीसाचा पाठ करावा. आपल्या मनातील देवाला सांगावं. येताना लिंबू सोबत आणावा आणि कोणत्याही नवीन कामासाठी घराबाहेर पडताना तो लिंबू सोबत घेऊन जावा.
 
वाईट दृष्ट काढा - जर एखाद्या बाळास वाईट नजर लागली असेल तर एक लिंबू घ्या आणि नंतर सात वेळा ओवाळून वाईट दृष्ट काढून टाका. आता त्या लिंबाचे चार तुकडे करा आणि एखाद्या एकांत ठिकाणी फेकून द्या जिथे ते कोणी पाहू शकणार नाही.
 
अस्वीकरण (Disclaimer): हा लेख लोक परंपरा आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. वेबदुनिया कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही किंवा अशा कोणत्याही प्रयोगाच्या परिणामाचा दावा करत नाही.