Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त महिलाच का करू शकतात टॅरो कार्ड रीडिंग?

Updated: शनिवार, 9 मार्च 2019 (14:51 IST)
 
म्हणून स्त्रिया असतात टॅरो कार्ड रीडर 
 
टॅरो कार्डवर अंक, रंग, संकेत तथा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश सारखे पाच तत्त्व दर्शवण्यात आले असतात, ज्यांच्या आधारे भविष्याचा अनुमान लावता येतो. तुम्ही बघितलेच असेल की जेथे ज्योतिष्याच्या इतर विद्यांमध्ये पुरुषांचा वर्चस्व असतो तसेच टॅरो कार्ड वाचणार्‍या लोकांमध्ये जास्त करून महिलाच असतात. यामागचे कारण असे आहे की टॅरो कार्ड एक अशी प्रणाली आहे ज्यात गणिताचा बिलकुल वापर होत नाही, फक्त अनुमान लावण्याची क्षमता अचूक असायला पाहिजे. वैज्ञानिकरीत्या देखील हे प्रमाणित झाले आहे की अनुमान लावण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त असते. म्हणून टॅरो कार्ड रीडर महिला असतात.
 
टॅरो कार्ड रीडिंगच्या अंतर्गत डेक (कार्ड्स) मधून उचलण्यात आलेले कार्डवर बनलेले चित्र व संकेतांचे अर्थ काय आहे, ते कोणत्या बाजूला इशारा करतात, तुमच्या भविष्याला कोणत्या दिशेत वळवू शकतात, च्या आधारावर भविष्यावाणी केली जाते. तसेच ते कार्ड प्रश्नकर्तेची वर्तमान वेळ आणि त्याची मानसिक स्थिती देखील दर्शवतात.  
 
टॅरो कार्ड काय आहे 
भविष्याच्या गर्भात काय आहे हे जाणून घेण्याची मानवी उत्सुकता आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. टॅरो ही अशीच एक पद्धत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय घडणार आहे याची सूचक माहिती यातून मिळते. त्यादृष्टीने नियोजन करण्यास सोपे जाते. सर्वप्रथम मध्ययुगीन कालखंडात युरोपात टॅरोचा वापर सुरू झाला. काहींच्या मते भारतातूनच ही भविष्यकथन पद्धती तेथे गेली. इटलीत तिचा मोठा वापर होत होता. त्यानंतर जगभर तेथूनच या पद्धतीचा प्रसार झाला.
 
टॅरोच्या गठ्ठ्यात ७८ कार्डे असतात. त्यांना मेजर आर्काना व मायनर आर्काना यांच्यात विभागले आहे. आर्काना हा शब्द लॅटिन भाषेतून आला आहे. भविष्याच्या पोटात दडलेली व्यक्तिगत माहिती सांकेतिक भाषेत मांडणे असा या शब्दाचा अर्थ आहे. टॅरो हा अनेकांसाठी अभ्यासाचा विषय आहे.
 
शब्द व अंक यांच्या माध्यमातून टॅरो भविष्य जाणून घेता येते. ही पद्धत जगात खूप लोकप्रिय आहे. त्यामुळे आता भविष्याच्या गुहेत टॅरोचा हात धरून कसे जायचे याची माहिती घेऊया.
 
टॅरो भविष्य कसे जाणून घ्यावे  
आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे, त्याची सुरवातीला उजळणी करून घ्या. गोंधळ उडू नये यासाठी तो कागदावर लिहिला तरी चालेल.
यानंतर 'कार्ड निवडा' यावर क्लिक करा. आता एकामागोमाग एक तीन कार्ड निवडा.
पहिले कार्ड प्रश्न विचारताना तुमची मनःस्थिती काय आहे याविषयी माहिती देते.
तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती दुसरे कार्ड देते.
तिसरे कार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते.

सर्व पहा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

'मोदी चालीसा': जिवंत व्यक्तींची पूजा आणि विधीवत उपासना करणे योग्य आहे का? हिंदू धर्माची तत्त्वे समजून घ्या

राखी खरेदी करताना या गोष्टी पाहिल्यात का? चुकीची राखी ठरू शकते अशुभ, जाणून घ्या काय काळजी घ्यावी

Jivati Katha Marathi श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

Jivati Puja 2026 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जरा जिवंतिका पूजनाच्या शुभेच्छा

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments