suvichar
✕

काय सांगता, काकडी मधुमेहासाठी रामबाण आहे

Updated: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (20:31 IST)
 
 
* रक्तातील साखरेची पातळी कमी करते-
या मध्ये असलेले घटक गटातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास प्रभावी आहे. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांसाठी काकडी फायदेशीर आहे.
 
* लठ्ठपणा कमी करते -
शरीराचे वजन वाढल्याने रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते. अशा परिस्थितीत काकडी शरीराचा लठ्ठपणा कमी करते. या मध्ये कमी कॅलरी आणि पोषक अधिक असतात. म्हणून  काकडी खाल्ल्यानं भूक लवकर लागत नाही.     
 
* रोग प्रतिकारक शक्ती वाढवते - 
रुग्णांची शक्ती वाढविण्यासाठी काकडी प्रभावी आहे, त्यात मुबलक प्रमाणात अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे शरीरात मुक्त रेडिकल्सशी लढण्यासाठी सामर्थ्य देतात, या मुळे जुन्या आजाराचा धोका कमी होतो.  
 
* डोळ्यांची दृष्टी सुधारते.  
ज्या लोकांना बऱ्याच काळापासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यांना दृष्टी संबंधित समस्यांना सामोरी जावे लागते. अशा परिस्थितीत काकडी खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. काकडी व्हिटॅमिन ए चे उत्तम स्रोत आहे. जी डोळ्याची दृष्टी वाढविण्यास उपयुक्त आहे.
 
* इन्स्युलिन ची पातळी चांगली होते-
काकडीमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात. जे युरिक ऍसिड नियंत्रित करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त या मध्ये प्युरीन नसते. जेव्हा शरीरातील युरिक ऍसिडची पातळी चांगली असेल तेव्हाच शरीरात इन्स्युलिनची पातळी देखील चांगली राहते.  
 
* डिहायड्रेशन किंवा निर्जलीकरण होणार नाही-
मधुमेह असलेल्या रुग्णांना वारंवार लघवी करण्याची समस्या उद्भवते, या मुळे पाण्याची कमतरता होऊ शकते. जेणे करून त्यांना थोड्या थोड्या वेळाने तहान लागू शकते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असतात, या मुळे शरीर हायड्रेट राहते.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Television Day 2026: जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास जाणून घ्या

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

पुढील लेख
Show comments